virat kohli
virat kohli twitter
क्रीडा | IPL

Virat Kohli: विराटला महाकाल पावले! कसोटीत तीन वर्षानंतर विराटनं ठोकलं शतक

Ankush Dhavre

Ind vs Aus 4th test Virat kohli: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५०० धावांचा पल्ला गाठला आहे.

यादरम्यान विराट कोहलीने तुफानी शतक झळकावले आहे. कसोटी कारकिर्दीतील २८ वे शतक झळकावताच विराटला महाकाल पावले अशा चर्चाना उधाण येऊ लागले आहे. (Latest sports updates)

विराट कोहलीने वनडे आणि टी -२० मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. कसोटीत तो धावा करताना तो संघर्ष करताना दिसून येत होता.

मात्र ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात शतक झळकावत त्याने तब्ब्ल ३ वर्षांनंतर शतक झळकावले आहे.

विराटची ही जोरदार खेळी पाहून विराटला महाकाल पावले अशा चर्चा रंगायला सुरु झाली आहे. इंदूर कसोटी सामना झाल्यानंतर विराटने आपली पत्नी अनुष्का शर्मासह महाकाल दरबारी हजेरी लावली होती.

मालिकेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे महाकाल दरबारी तो प्रार्थना करण्यासाठी गेला होता. आता त्याच्या प्रार्थनेला कुठेतरी यश आल्याचे दिसून येत आहे.

विराटने २०१९ मध्ये झळकावले होते शेवटचे शतक..

गेल्या ४ वर्षांपासून विराट कोहली शतक झळकावण्याची वाट पाहत होता . ही प्रतीक्षा आता संपली आहे. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश विरुध्द झालेल्या सामन्यात १३६ धावांची खेळी केली होती.

ही त्याची शेवटची शतकी खेळी ठरली होती. त्यानंतर ४ वर्ष तो कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकला नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?

Japan vs Mongolia: विश्वासच बसेना! ६ फलंदाज शून्यावर बाद ; स्कोअरबोर्ड पाहून डोकं चक्रावून जाईल

"आमच्या फुलाचं सौंदर्य खुललंय..."; 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने Met Gala 2024 सोहळा गाजवला

Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

SCROLL FOR NEXT