Vinesh Phogat @sportwalkmedia
क्रीडा

Vinesh Phogat : विनेश फोगाटने इतिहास रचला, अशक्य ते शक्य केलं, गतविजेत्या पैलवानाला अस्मान दाखवलं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paris Olympics 2024, vinesh phogat : विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. विनेश फोगाटने गतविजेत्या पैलावानाला चारी मुंड्या चीत करत विजयी सुरुवात केली. भारतीय पैलवान विनेश फोगाट (Vinsesh Phogat Match) हिने गतविजेत्या युवी सुसाकी हिचा पराभव करत मोठा उलटफेर केला. अखेरच्या मिनिटात विनेश फोगाटने जोरदार मुसंडी मारत सामना विजय मिळवला. अखेरच्या मिनिटांपर्यंत युवी सुसाकी ही 0-2 आघाडीवर होती. पण शेवटच्या मिनिटात विनेश फोगाटनं डाव टाकत विजयावर शिक्कामोर्तब केले. युवी सुसाकी (world no 1 Yui Susaki) हिचा पराभव करत विनेश फोगाटने क्वार्टर फायनलमध्ये स्थान पटकावलेय.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वर्ग फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात कठीण सामना मिळाला होता. पहिलाच सामना गतविजेत्या आणि नंबर एक कुस्तीपटू युवी सुसाकी हिच्यासोबत होता. विनेश फोगाटसाठी हा सामना कठीण मानला जात होता. पण अखेरच्या क्षणात युवी सुसाकी हिचा पराभव करत विनेश फोगाटने भारताची मान उंचावली. विनेश फोगाटने युवी सुसाकी हिचा ३-२ असा पराभव केला. विनेश फोगाटने अखेरच्या मिनिटात जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. अखेरच्या मिनिटांपर्यंत युवी सुसाकी ही 0-2 आघाडीवर होती. पण शेवटच्या मिनिटात विनेश फोगाटनं जोरदार डाव टाकत विजयावर शिक्कामोर्तब केले. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाली आहे.

निरज चोप्राची फायनलमध्ये धडक -

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील ११ व्या दिवशी भारतीय फॅन्ससाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. निरज चोप्रा आणि विनेश फोगाट यांच्याकडून भारताला पदकाची आपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT