Vinesh Phogat disqualified Saam TV
क्रीडा

Vinesh Phogat News : मोठी बातमी! विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित, भारताचं पदक हुकलं; नेमकं कारण काय?

Vinesh Phogat disqualified from Olympics for being overweight in Women Wrestling: कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आलंय.

Satish Daud

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामागे मोठं कारणंही समोर आलंय. 50 किलो कुस्ती स्पर्धेत फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलंय. त्यामुळे तिला फायनलमध्ये भाग घेता येणार नाही.

विनेश फोगाटला सिव्हर मेडलही मिळणार नाही

त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, अपात्र ठरवल्याने विनेश फोगाटला (Vinesh Phogat) सिव्हर मेडल देखील मिळणार नाही. या बातमीने कोट्यवधी भारतीय नाराज झाले आहेत. विनेश फोगाटने वर्ल्ड चॅम्पियन महिलेला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

विनेशच्या या कामगिरीने कोट्यवधी भारतीय आनंदीत झाले होते. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर देखील केला. आता विनेश फायनल सामना जिंकून भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड नक्कीच मिळवणार अशी क्रीडाप्रेमींना आशा होती. मात्र, फायनल सामन्यापूर्वी विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलंय.

विनेश फोगाटला का अपात्र ठरवण्यात आलं?

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा वृत्ताला खुद्द भारतीय ऑलिम्पिक (Olympics news 2024) संघटनेनेच दुजोरा दिला आहे. फायनल सामना सुरू होण्याआधीच आज सकाळी विनेशचे वजन करण्यात आले. यावेळी तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम अधिक भरले. म्हणूनच तिला अपात्र घोषित करण्यात आल्याचं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटले आहे.

असोसिएशनने सांगितले की, "विनेश फोगाटला महिला कुस्तीच्या 50 किलो गटातून अपात्र ठरवण्यात आल्याचे भारतीय संघाला दु:ख झाले आहे. मंगळवारी विनेशचे अचानक 2 किलो वजन वाढले होते. संघाने तिचे वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, तरीही आज सकाळी तिचे वजन 100 ग्रॅम अधिक भरले".

दरम्यान, अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने मंगळवारी तिच्या आईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. विनेशने आई आणि कुटुंबीयांशी बोलताना सुवर्णपदक जिंकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता ती या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. या बातमीने कोट्यवधी भारतीयांची मने दुखावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT