shreyas iyer twitter
Sports

Vijay Hazare Trophy: 10 षटकार, 5 चौकार... Shreyas Iyer ची बॅट तळपली; पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक

Shreyas Iyer Century: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अय्यरने शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

भारतात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी मुंबई आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे.

कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करताना, त्याने ५१ चेंडूंचा सामना करत ११४ धावांची खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार आणि १० षटकार मारले.

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा ही श्रेयस अय्यरसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अय्यर ४ महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघासाठी खेळताना दिसून आला होता.

त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. या स्पर्धेत दमदार कामगिरी करुन तो भारतीय संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्या दिशेने त्याने एक पाऊस टाकलं आहे.

अय्यरकडून कर्नाटकच्या गोलंदाजांची धूलाई

या सामन्यात फलंदाजी करताना, अय्यरने २०७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ५५ चेंडूंचा सामना केला आणि ११४ धावा केल्या. अय्यरला साथ देत आयुष म्हात्रेने ७८, यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने ८४ धावांची खेळी केली. यासह शिवम दुबेने ६३ धावांचे योगदान दिले. या तुफन फटकेबाजीच्या बळावर मुंबईने ५० षटकअखेर ३८२ धावा केल्या.

अय्यरची दमदार कामगिरी

देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी सुरुच आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अय्यरने दमदार फलंदाजी केली होती .मात्र त्यानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याने कमबॅक केलं, मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना पाठ फिरवली होती. आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा ठोकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Reservation : ओबीसी समाजाला मोठा धक्का! सरकारच्या ४२ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Govinda and Sunita Ahuja Divorce: मी खूप वेळा माफ केले, पण...; पत्नी सुनीतासोबतच्या डिव्होर्सच्या अफवांवर गोविंदाचा मोठा खुलासा

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने उद्या काळी दिवाळी साजरी

Antibiotic failure: अँटीबायोटिक्सचा परिणाम होतोय कमी; औषधे निष्प्रभ ठरल्यास किती जणांचे जीव धोक्यात? आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT