team india news Saam tv
Sports

टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार खेळाडू संघाबाहेर जाणार? सूर्यकुमार यादवने दिली मोठी हिंट

team india news : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू संघाबाहेर जाणार असल्याची चर्चा आहे.

Vishal Gangurde

भारत- न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप फायनल रंगणार .

वरुण चक्रवर्तीच्या प्लेइंग ११ मधील स्थानाबाबत अनिश्चितता

सुपर-८ स्टेजमध्ये सुमार कामगिरी केल्याचा ठपका

टी२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघाने जोरदार तयारी केली आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाकडून कोणाला संधी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. टी २० वर्ल्डकप फायनलआधीच एक मोठी अपडेट सूत्रांकडून आली आहे. या सामन्यात वरुण चक्रवर्ती खेळणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

वरुण चक्रवर्तीने सुपर-८ स्टेजनंतर फक्त ४ विकेट घेतले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये वरुण चक्रवर्तीने इंग्लंडच्या विरोधातील टी२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केल्याचे दिसून आलं. त्याने ६४ धावा देऊन १ गडी बाद केला होता.

टी२० वर्ल्डकपच्या सुपर-८ स्टेज सुरू झाल्यानंतर त्याने खराब कामगिरी केल्याचे दिसून आलं. त्याने एकही सामन्यात करिष्मा दाखवला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या फायनलच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये संधी द्यायची का, यावर विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

सूर्यकुमार यादवला अंतिम सामन्याच्या एक दिवसआधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटलं की, 'मॅनेजमेंट चक्रवर्तीच्या कामगिरीविषयी चिंतेत नाहीत. परंतु त्यांना आताही वाटतं की, वरुण संघाचा चांगला स्पिनर आहे, तो फायनलमध्ये चांगली कामगिरी करू शकतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT