Suryakumar Yadav Praises Vaibhav Sooryavanshi saam tv
Sports

Vaibhav Suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सिनियर टीम इंडियामध्ये करणार डेब्यू? भारतीय कर्णधाराच्या सोशल मीडिया पोस्टने रंगली चर्चा

Suryakumar Yadav Praises Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ एलिमिनेटरमध्ये ९७ धावांची तुफानी खेळी केली. सूर्यकुमार यादवसह अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केल्याने टीम इंडियामध्ये पदार्पणाची चर्चा जोर धरत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात १५ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने त्याच्या तुफान खेळीने खळबळ उडवून दिलीये. तो ऐतिहासिक शतकापासून केवळ तीन रन्स दूर राहिला. मात्र त्याच्या खेळीने सर्वांची मनं जिंकलीयेत. दरम्यान अशातच त्याचा टीम इंडियामध्ये समावेश होणार अशी चर्चा रंगलीये.

भारतीय टी-२० टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वैभवचं कौतुक केलंय. ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची शक्यता वर्तवली जातेय.

वैभवसाठी सूर्याची खास पोस्ट

बुधवारी चंदीगढच्या स्टेडियममध्ये वैभवने अवघ्या २९ चेंडूंमध्ये १२ सिक्स आणि पाच चौकारांसह ९७ रन्स केले. त्याचा स्ट्राईक रेट ३३४ पेक्षा जास्त होता. सामन्यानंतर, सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केलीये. ज्यामध्ये त्याने वैभवला 'उदयोन्मुख तारा' म्हटलंय. सूर्याने लिहिलंय, "धीर सोडू नकोस, मित्रा. काय जबरदस्त खेळी होती! तू सर्वांना निःशब्द केलंस. एक उदयोन्मुख तारा."

अनेक दिग्गजांकडून वैभवचं कौतुक

सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल आणि मायकल वॉन यांसारख्या दिग्गजांनी त्याच्या निर्भीड फलंदाजीचे कौतुक केलंय. एलिमिनेटर सामन्यापूर्वीच वॉनने बीसीसीआयला या किशोरवयीन खेळाडूचा भारतीय वरिष्ठ टीमम्ये समावेश करण्याचा विचार करावा, असं सुचवलं होतं.

वैभवने या आयपीएलच्या सिझनमध्ये ४५.३३ च्या सरासरीने आणि २४२.८६ च्या स्ट्राइक रेटने ६८० रन्स केलेत. आयपीएल २०२६ संपल्यानंतर लगेचच वैभव श्रीलंकेतील तिरंगी सिरीजसाठी भारत 'अ' टीमचा भाग असणार आहे.

वैभव सूर्यवंशीच्या भारतीय टीममध्ये पदार्पणाबद्दलची चर्चा अधिकच जोर धरतेय. माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही वैभवच्या भविष्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. कोलकात्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना गांगुली म्हणाला की, वैभव सध्या टी-२० क्रिकेटसाठी पुरेसा प्रतिभावान आहे, परंतु टेस्ट क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला अधिक वेळ देण्याची गरज आहे.

गांगुलीच्या मते, या युवा खेळाडूला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळण्यापूर्वी प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांची मोठी कामगिरी; ३७७ हरविलेले अन् चोरी गेलेले मोबाईल तक्रारदारांना परत

IPS Transfer List: राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल; १५ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली पोस्टिंग

Gaurav Gogoi: शिक्षण व्यवस्थेवर चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान इंस्टाग्राम रिल्समध्ये व्यस्त; गौरव गोगोईंचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra News Live Update: अखेर 24 तासानंतर सातारा - महाबळेश्वर मार्गावरीलर केळघर घाट वाहतुकीसाठी खुला

JR. NTR: सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला; अभिनेत्याला नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT