Vaibhav Suryavanshi x
Sports

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

Vaibhav Suryavanshi Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-१९ वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ठोकण्याचे विक्रम केला आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng कसोटी मालिकेतील दुसरा सामना सध्या बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने द्विशतक झळकावले. सामन्यामध्ये त्याने २६९ डावांची खेळी केली. या सामन्यादरम्यान युवा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशी स्टँडमध्ये बसून गिलची खेळी पाहत होता.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या सोबतच भारत विरुद्ध इंग्लंड अंडर १९ वनडे मालिका देखील सुरु आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने ऐतिहासिक शतक झळकावले. शतकीय खेळीची प्रेरणा मला शुभमन गिलच्या खेळीपासून मिळाल्याचे वैभव सूर्यवंशीने म्हटले. वैभव हा वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा ठरला आहे.

वैभव सूर्यवंशीने शनिवारी (५ जुलै) वनडे सामन्यात ५२ चेंडूंमध्ये शतक ठोकले. या शतकीय खेळीसह त्याने अनेक विक्रम मोडले. आता द्विशतक झळकवण्यावर माझे लक्ष आहे, असे वैभवने म्हटले. सामन्यानंतर त्याने द्विशतकीय खेळीसाठीची योजना सांगितली. या संबंधित एक व्हिडीओ बीसीसीआयने एक्सवर पोस्ट केला आहे.

'मला माहीत नव्हते, की मी एक विक्रम केला आहे. आमचे संघ व्यवस्थापक अंकीत सरांकडून मला याबाबत समजले. शुभमन गिलकडून मला खूप प्रेरणा मिळाली. मी त्याला खेळताना पाहिले. एक शतक आणि एक द्विशतक केल्यानंतरही तो खेळ सोडून गेला नाही. तो संघाला पुढे घेऊन गेला', असे वैभवने व्हिडीओमध्ये म्हटले. यासोबतच त्याने गिलप्रमाणे द्विशतकीय खेळी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

वैभवने ७८ चेंडूंमध्ये १४३ धावांची खेळी केली. यात त्याने १३ चौकार आणि १० षटकार मारले. 'मी जास्त वेळ खेळू शकलो असतो. आमच्याकडे बराच वेळ होचा. २० ओव्हर्सचा खेळ शिल्लक होता. एक शॉट मी मारलो, ज्यात मी १०० टक्के देऊ शकलो नाही, त्याच शॉटमुळे मी बाद झालो. पुढच्या सामन्यात २०० धावा करण्याचा आणि संपूर्ण ओव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करेन', असे वैभव सूर्यवंशीने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT