Vaibhav Suryavanshi celebrates after a record-breaking IPL season, now set for a historic Team India debut. saam tv
Sports

धडाकेबाज वैभवची टीम इंडियात एन्ट्री, वैभव सूर्यवंशीनं रचला नवा इतिहास

Teenage Sensation Vaibhav Earns India Call, Eyes Historic Debut: आयपीएलमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर करणारा वैभव सूर्यवंशी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम तो मोडणार आहे. कोणता आहे हा विक्रम ?आणि यामुळे वैभवच्या क्रिकेट करियरला कशी कलाटणी मिळणार आहे? त्यावरचा हा रिपोर्ट

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

बीसीसीआयनं आगामी इंग्लंड, आयर्लंड आणि जपानमधील आशियाई खेळांसाठी टी-20 संघाची घोषणा केलीये. बीसीआयच्या निवड समितीनं सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतलाय तो म्हणजे, वैभव सुर्यवंशीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात समावेश करण्याचा... त्यामुळे वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 15व्या वर्षी भारतीय क्रिकेट इतिहासात कसा नवा अध्याय रचलाय पाहा.

वैभवनं तोडला सचिनचा रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरनं आपली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच 1989 च्या पाकिस्तान दौऱ्यात खेळली तेव्हा त्याचं वय 16 वर्षे आणि 205 दिवस इतकं होतं.

तर वैभव सूर्यवंशी आपली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच आर्यलंडविरोधात खेळणार असून त्याचं वय 15 वर्षं 87 दिवस इतकं असेल.

दरम्यान, भारतीय संघात निवड झालेल्या वैभव सुर्यवंशीच्या यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीवर एक नजर टाकूयात...

विक्रमवीर वैभव सूर्यवंशी

वैभवनं आयपीएल 2026 मध्ये 14 सामन्यांमध्ये 776 धावा केल्यात

IPLमध्ये पाचव्यांदा 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम

ख्रिस गेलचे 59 सिक्स मागे टाकून एका हंगामात सर्वाधिक 65 सिक्स

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 5 वेळा 50+ धावा करणारा दुसरा फलंदाज

एका डावातील पॉवरप्लेमध्ये 8 षटकार मारणारा पहिलाच फलंदाज

300+ स्ट्राईक रेटनं सर्वाधिक 3 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा जागतिक विक्रम

नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर वैभवला आंतरराष्ट्रीय संघात स्थान द्यावं यासाठी अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटू आग्रही होते. वैभवनं आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाचा सचिनचा विक्रम मोडला असला तरी विदेशी पीचवर आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. मायदेशात आयपीएलमध्ये चौके-छक्के लावणारा वैभव सूर्यवंशी परदेशी मैदानंही गाजवणार का याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Accident: बारामतीमध्ये थरकाप उडवणारा अपघात, भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून २ मुलींचा मृत्यू

तलावात पोहायला जाणं पडलं महागात; तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ

Maharashtra Politics: विधानपरिषदेत घोडेबाजार, सुळे बिल आणणार; वडेट्टीवारांचे स्वपक्षीयांवर पैसे वाटल्याचे आरोप

Maharashtra News Live Update: जळगावच्या सावदा शहरासह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Success Story: बीडच्या लेकींनी नाव कमावलं! ऊसतोडणी कामगाराच्या मुलींची गगनभरारी, ४ सख्ख्या बहिणी एकाच वेळी झाल्या पोलिस

SCROLL FOR NEXT