Usain Bolt  x
Sports

Usain Bolt : जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टला आता एक पाऊलही टाकणं जड जातंय,ऑलिम्पियन दिग्गज म्हणाला...

Usain Bolt Update : सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या उसेन बोल्टने २०१७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर त्याच्या शरीरावर परिणाम झाला आहे. पायऱ्या चढतानाही त्याला त्रास होत आहे.

Yash Shirke

  • २०१७ मध्ये निवृत्तीनंतर उसेन बोल्ट आता धावण्यापेक्षा घरीच वेळ घालवतो.

  • वयाच्या ३९ व्या वर्षी उसेन बोल्टला पायऱ्या चढतानाही त्रास होतो.

  • त्याची शारीरिक स्थिती पूर्वीसारखी नाही, पण तो मुलांसोबत वेळ घालवतो.

Usain Bolt News : जगातील सर्वात वेगवान माणूस अशी ओळख असलेला महान धावपटू उसेन बोल्टची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. तो शारीरिकदृष्ट्या उत्तम स्थितीत दिसला तरीही तो अंतर्गतदृष्ट्या तो पूर्वीसारखा राहिला नाहीये. उसेन बोल्टने २०१७ मध्ये निवृत्ती घेतली. त्याने १०० मीटर, २०० मीटर आणि ४x१०० मीटर रिलेमध्ये जागतिक विक्रम केले होते. ११ वेळा विश्वविजेता राहिलेला बोल्ट आता धावण्यापेक्षा घरीच थांबणे पसंत करतो.

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत बोल्ट म्हणाला, 'मी मुलांना शाळेत जाताना पाहण्यासाठी वेळेवर उठतो. त्यानंतर दिवसभर काय करायचे हे मूडनुसार ठरतो. काही करायचे नसेल तर मी आराम करतो. मूड चांगला असेल तर, कधीतरी व्यायाम करतो. घरी बसून काही मालिका पाहतो, चित्रपट पाहतो. मुलांसोबत वेळ घालवतो. मी आता लेगोमध्ये आहे, म्हणून मी लेगो खेळतो.'

यंदाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला उसेन बोल्ट हजर होता. पण तो धावपट्टीवर नव्हता तर स्टेडियमच्या स्कायबॉक्समध्ये बसलेला होता. बोल्टच्या निवृत्तीनंतर ट्रॅक अ‍ॅथलेटिक्स पूर्वीसारखे राहिलेले नाही हे त्याची उपस्थिती दर्शवत होते. आता ऑब्लिक सेव्हिल १०० मीटरचा विश्वविजेता असला तरी, या शतकात खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेला एकमेव ट्रॅक स्टार उसेन बोल्टच आहे. निवृत्तीनंतर आठ वर्षांनीही कोणी त्याच्या दर्जाला किंवा त्याच्या प्रभावाला गाठू शकलेले नाही. उसेन बोल्ट आता तीन मुलांचा बाबा आहे. त्याच्या मुलांना अजूनही त्यांचे वडील किती मोठे स्टार होते याची जाणीव नाही.

ट्रॅक फील्डपासून दूर राहिल्याचा परिणाम बोल्टवर परिणाम झाला आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी, पायऱ्या चढणेही त्याच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे. बोल्ट म्हणतो, 'मी जिममध्ये व्यायाम करतो. पण धावायला फारसा वेळ देत नाही. आता बराच काळ ट्रॅक फील्डपासून बाहेर राहिल्यामुळे मला धावण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. पायऱ्या चढताना मला धाप लागते. पण पूर्णपणे व्यायाम सुरु केल्यावर माझा श्वास योग्यरित्या घेण्यासाठी मला काही लॅप्स करावे लागतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT