Footballer Christian Atsu Killed In Turkey Earthquake
Footballer Christian Atsu Killed In Turkey Earthquake Twitter
क्रीडा | IPL

Turkey Earthquake : तुर्कीच्या भूकंपात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, घराच्या ढिगाऱ्याखाली दबला होता मृतदेह

Chandrakant Jagtap

Footballer Christian Atsu Killed In Turkey Earthquake: तुर्कस्तानमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिश्चन अत्सूचा मृत्यू झाला आहे. घानाचा फुटबॉलपटू आणि न्यूकॅसलचा माजी मिडफिल्डर ख्रिश्चन अत्सुचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या घटनेनंतर बेपत्ता लोकांच्या यादीत त्याचे नाव होते. तो ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपापासून बेपत्ता होता.

तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात फुटबॉलपटू ख्रिश्चन अत्सू (Christian Atsu) घराच्या मलब्याखाली गाडला गेला होता. भूकंपानंतर त्यांच्यासाठी शोधमोहीम राबविण्यात येत होती. जगभरातील चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होते. परंतु शनिवारी त्याने अखेरचा श्वास घेतला. तुर्की रेडिओने फुटबॉलपटूच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. (Sports News)

मलब्यात सापडला मृतदेह आणि फोन

तुर्कीमधील ख्रिश्चन अत्सुचे मॅनेजर उझुनमेहमेट यांनी शनिवारी त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. डीएचए वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, फुटबॉलपटूचा मृतदेह तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील प्रांत हॅटे येथे ढिगाऱ्याखाली सापडला आहे. त्याचे उर्वरित सामानही बाहेर काढले जात आहे. ढिगाऱ्यातून अत्सुचा फोनही सापडला आहे. (Latest Sports News)

फुटबॉलपटूच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का

घानाच्या फुटबॉलपटूचे एजंट नाना सेचेरे यांनी ट्विट केले की, आज सकाळी अत्सुचा मृतदेह सापडल्याची माहिती हितचिंतक आणि मित्रांना देताना खूप दु:ख होत आहे. या दु:खाच्या प्रसंगात त्याच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आमच्या संवेदना आहेत. अत्सु हा तुर्की फुटबॉल लीगचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील त्याचे चाहत्यांना धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT