pakistan twitter
Sports

IND U19 vs PAK U19: पाकिस्तानची ओपनिंग जोडी चमकली! भारताविरुद्ध खेळताना पहिल्यांदाच केला हा महारेकॉर्ड

India U19 vs Pakistan U19: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानी सलामी जोडीने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Ankush Dhavre

U-19 Asia Cup 2024: अंडर १९ एशिया कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय पाकिस्तानच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. पाकिस्तानकडून फलंदाजी करताना, शाहजेब खानने शानदार शतकी खेळी केली. त्याने उस्मान खानसोबत मिळून १६० धावांची शानदार भागीदारी केली. या शानदार भागीदारीसह पाकिस्तानच्या जोडीने भारतीय संघाविरुद्ध खेळताना मोठा रेकॉर्ड बनवला आहे.

शाहजेबची शानदार शतकी खेळी

पाकिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना ५० षटकअखेर ७ गडी बाद २८१ धावा केल्या. पाकिस्तानकडून सलामीला फलंदाजी करताना शाहजेबने स्लो सुरुवीक केली. मात्र एकदा सेट झाल्यानंतर त्याने दमदार कमबॅक केलं. शाहजेब आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची फलंदाजी स्टाईल ही फखर जमान सारखीच आहे.

सलामीला फलंदाजी करताना उस्मान खानने ९४ चेंडूंचा सामनाक करत ६ चौकारांच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. तर शाहजेब खानने १४७ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि १० षटकारांच्या साहाय्याने १५९ धावांची खेळी केली.

दोघांनी मिळून १६० धावांची भागीदारी केली. ही भारतीय अंडर १९ संघाविरुद्ध खेळताना पाकिस्तान संघाकडून केली गेलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी इमाम-उल-हक आणि समी असलम यांनी २०१४ मध्ये फलंदाजी करताना १०९ धावांची भागीदारी केली होती. आता १० वर्षांनंतर पाकिस्तानने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, मोहम्मद अमान (कर्णधार), हर्वंश सिंग (यष्टीरक्षक), निखिल कुमार, किरण चोरमले, हार्दिक राज, मोहम्मद एना, समर्थ नागराज, युधाजित गुहा.

पाकिस्तान संघ: शाहजेब खान, उस्मान खान, साद बैग (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फरहान युसुफ, फहम-उल-हक, मोहम्मद रियाजुल्ला, हारून अरशद, अब्दुल सुहान, अली रजा, उमर झैब, नविद अहमद खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT