umpire dies on field x
Sports

Umpire Death : सामना सुरू असताना मैदानात अंपायरचा मृत्यू, क्रिकेट विश्वात हळहळ

Cricket News : सुंदर क्रिकेट क्लबच्या एका सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अंपायर प्रसाद माळगावकर मैदानावर कोसळले. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रसाद माळगावकर यांना मृत घोषित केले.

Yash Shirke

मुंबईत एका क्रिकेट सामन्यादरम्यान दु:खद घटना घडली. सुंदर क्रिकेट क्लबच्या मैदानावर केआरपी इलेव्हन सीसी आणि क्रेसेंट सीसी यांच्यात झालेल्या भामा कप अंडर-१९ स्पर्धेच्या सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अंपायर प्रसाद माळगावकर यांचा मैदानात मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद माळगावकर (वय ६० वर्ष) हे भामा कप अंडर-१९ स्पर्धेच्या सामन्यात ११ व्या ओव्हरमध्ये स्क्वेअर लेगवर उभे होते. काही मिनिटांमध्ये ते जमिनीवर कोसळले. प्रसाद माळगावकर यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सामन्याचे अंपायर पार्थमेश आंगणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वी प्रसाद माळगावकर यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास झाला होता. 'टॉसपूर्वी त्याला बरं वाटत नव्हतं. अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले होते. पहिल्या १० ओव्हर्सपर्यंत तो ठीक वाटत होता. १०.२ ओव्हरनंतर तो खाली पडला आणि त्याला व्यवस्थितपणे श्वास घेत येत नव्हता. त्यानंतर एमसीए समन्वयक दत्ता मिठबावकर यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले आम्ही त्यांना लवकरात लवकर बॉम्बे हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न केला', असे वक्तव्य आंगणे यांनी मिडडेशी बोलताना केले.

बॉम्बे हॉस्पिटलमधील कॅज्युअल्टी वॉर्डच्या एका डॉक्टरने मिडडेशी संवाद साधताना माहिती दिली. प्रसाद माळगावकर यांची रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळी लक्षात न आल्याने आपत्कालीन कक्षात नेण्यात आले. ईसीजीमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही. दुर्दैवाने, प्रसाद माळगावकर यांना मृत घोषित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT