IND VS AUS 3rd Test: इंदूरच्या मैदानावर भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये भारत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता.
तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजानी देखील पलटवार केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशी उमेश यादवने भन्नाट वेगाने चेंडू टाकून मिचेल स्टार्कला माघारी धाडले आहे. (Latest sports updates)
इंदूरच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत आहे. आतापर्यंत या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने चेंडू उमेश यादवच्या हातात दिला आणि त्याने सामन्याचे चित्र बदलून ठेवले.
मिचेल स्टार्कची केली दांडी गुल..
तर झाले असे की, ७४ वे षटक टाकण्यासाठी उमेश यादव गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील तिसरा चेंडू टप्पा पडताच डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आत आला. त्याला चेंडू कळायच्या आत, चेंडू यष्टीला जाऊन धडकला.
या चेंडूची गती इतकी होती की, चेंडू यष्टीला लागतच यष्ठी ४-५ फूट लांब जाऊन पडली. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या १०० विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले आहेत. यासह ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.