Rinku Singh  Saam TV
क्रीडा

Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

Rinku Singh On Umesh Yadav: हे षटकार मारण्यापूर्वी उमेश यादवने ४ शब्द म्हटले होते.

Ankush Dhavre

Rinku Singh IPL 2023: रिंकू सिंग हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या रिंकू सिंगने गुजरात टायटन्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात अप्रतिम खेळी करत सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघ अडचणीत असताना तो फलंदाजीला आला आणि त्याने तुफानी खेळी करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. हे षटकार मारण्यापूर्वी उमेश यादवने ४ शब्द म्हटले होते.

त्यानंतर रिंकू सिंगमध्ये ऊर्जा संचारली आणि त्याने ५ षटकार ठोकले. कुठले होते ते ४ शब्द ? जाणून घ्या.

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी इतिहास घडला. गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम षटकात विजय मिळवण्यासाठी २९ धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंग फलंदाजीला आला आणि पुढे जे घडलं ते कोणीच विसरू शकणार नाही.

अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १ धाव घेत रिंकू सिंगला स्ट्राईक दिली. त्यानंतर पुढील ५ चेंडू रिंकू सिंगने मैदानाच्या बाहेर पाठवले.

ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर रिंकू सिंगने म्हटले की,'मला स्वतःवर विश्वास होता मात्र उमेश यादवने माझा आत्मविश्वास आणखी वाढवला. उमेश यादवने मला म्हटले की, लगा रिंकू सोचियो मत..' मग काय रिंकूने कसलाही विचार न करता सलग ५ षटकार ठोकले आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाकडून विजय शंकरने २४ चेंडूंमध्ये ६३ धावांची खेळी केली.

तर साई सुदर्शनने ५३ धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ४ गडी बाद २०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली.

तर रिंकू सिंगने शेवटी फलंदाजीला येऊन नाबाद ४८ धावांची खेळी केली आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WPL 2025 Retention: महिला प्रीमियर लीगची रिटेन्शन लिस्ट जाहीर,कोणत्या संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं बाहेर?

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT