U19 Women WC  Saamtv
Sports

U-19 T20 World Cup- गोलंदाजीत पोरींची कमाल, इंग्डलची दाणादाण, विजयासाठी ठेवले अवघे ६९ धावांचे आव्हान

भारतीय खेळाडूंच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.

Gangappa Pujari

U-19 T20 World Cup: शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या इंग्लंडची फायनलमध्ये घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. भारतीय खेळाडूंच्या गोलंदाजीपुढे इंग्लडची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.

इंग्लंडचा संपूर्ण संघ 17.1 षटकांत 68 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याचवेळी सोफिया स्मेल आणि अलेक्स स्टेनहाऊसच्या बॅटमधून 11-11 धावा झाल्या. टीम इंडियाच्या खेळाडूंपुढे विजयासाठी अवघ्या ६९ धावांचे आव्हान दिले आहे. (World Cup)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १७.१ षटकांत ६८ धावांत गारद झाला. इंग्लंडकडून रायन मॅकडोनाल्ड गेने सर्वाधिक १९ धावा केल्या. त्याचवेळी सोफिया स्मेल आणि अॅलेक्स स्टेनहाऊसच्या बॅटमधून 11-11 धावा झाल्या. संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला ( ०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा ( १०) त्रिफळा उडवला.

कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला ( ४) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले.भारताकडून टी. साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मन्नत कश्यप, सोनम यादव आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (Women Cricket)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT