U19 World Cup into Semifinal Twitter/ @BCCI
Sports

U19 World Cup: निम्मे स्टार संघाबाहेर तरीही भारताचा विजय; उपांत्यापुर्व फेरीत प्रवेश

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

वृत्तसंस्था

अंडर-19 विश्वचषकात (U19 World Cup) भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने आयर्लंडचा 174 धावांनी पराभव केला. हरनूर सिंगला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हा विजय मोठा आहे कारण संघाचा कर्णधार यश धुलसह 6 खेळाडू कोरोनामुळे सामन्यातून बाहेर पडले होते. (latest news on U19 cricket World Cup India in semifinals)

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. Angkrish Raghuvanshi आणि हरनूर सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला. हरनूर सिंगने 101 चेंडूत 88 तर रघुवंशीने 79 चेंडूत 79 धावा केल्या. यश धुलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधू कर्णधार होता, त्याने 36 धावांची खेळी केली. टीम इंडियाने (Team India) आयर्लंडसमोर विजयासाठी 308 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 39 षटकांत 133 धावा करून सर्वबाद झाला. गरव सांगवान, अनिश्वर गौतम आणि कौशल तांबे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताकडून 8 खेळाडूंनी गोलंदाजी केली. सामन्यापूर्वी कर्णधार यश धुलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यासोबत आणखी 3 खेळाडूही पॉझिटिव्ह आढळले असून, 2 खेळाडू संपर्कामुळे आल्यामुळे सामन्याबाहेर आहेत. म्हणजेच एकूण 6 भारतीय खेळाडू सामना खेळत नव्हते.

या विजयासह टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. याआधी टीम इंडियाने 4 वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय संघ आपल्या पाचव्या विजेतेपदासाठी खेळत असून, जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT