U-19 World Cup Final IND vs AUS  Saam TV
Sports

U-19 World Cup Final : भारत विजयाचा 'षटकार' लगावणार? नवव्यांदा फायनल गाठणाऱ्या टीम इंडियाची जबरदस्त आकडेवारी

U-19 World Cup Final IND vs AUS : अंडर १९ विश्वचषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत तब्बल आठ वेळा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. ज्यापैकी पाच वेळा विजयी मिळवला आहे.

प्रविण वाकचौरे

U-19 World Cup Final :

अंडर १९ विश्वचषकाचा अंतिम सामना आज (११ फेब्रुवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ संघाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. आता दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील अंतिम सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे.

अंडर १९ विश्वचषकात भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत तब्बल आठ वेळा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला आहे. ज्यापैकी पाच वेळा विजयी मिळवला आहे. यंदाची ही नववी वेळ आहे. तर ऑस्ट्रेलियाने तीन वेळा अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे. (Latest News)

भारतीय संघाची आजवरची कामगिरी

२०००

मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात अंडर १९ संघाने श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला. युवराज सिंग देखील या संघाचा एक भाग होता. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२००६

भारताने 2006 मध्ये दुसऱ्यांदा अंडर-१९ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. रविकांत शुक्लाच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानचा सामना केला ज्यात संघाला 38 धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला. या संघात रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, पियुष चावला हे खेळाडू होते.

२००८

भारताच्या अंडर-१९ संघाला २००८ मध्ये अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात DLS पद्धतीने भारताने दक्षिण आफ्रिकेचा 12 धावांनी पराभव केला. विराट कोहली संघाचा कर्णधार होता.

२०१२

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक आपल्या नावे केला होता. उन्मुक्त चंदच्या नाबाद १११ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाचा विजय सोपा झाला. हनुमा विहारी आणि संदीप शर्मा हे देखील विजेत्या संघात होते.

२०१६

मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताला वेस्ट इंडिजकडून दारूण पराभव पत्करावा लागला. इशान किशनच्या नेतृत्वाखालील भारताच्या अंडर-१९ संघाचा वेस्ट इंडिजने पाच विकेट्सने पराभव केला. या संघात ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, खलील अहमद आणि आवेश खान या स्टार खेळाडूंचा समावेश होता.

२०१८

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेला हा सामना भारताने जिंकला. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने हा विजय मिळवला. शुभमन गिल आणि शिवम मावी या खेळाडूंचा या संघात समावेश होता.

२०२०

या सामन्यात भारताला बांगलादेशकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशने DLS पद्धतीने हा सामना जिंकला. या संघात यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि रवी बिश्नोई यांचा समावेश होता.

२०२२

भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. यश धुलच्या नेतृत्वाखालील संघाने ही कामगिरी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT