Ind Vs SA Test Match Saam TV
Sports

साऊथ आफ्रिका संघाला एकाच दिवशी दोन मोठे धक्के!

सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षकाची कामगिरी निराशाजनक होती.

वृत्तसंस्था

IND vs SA: सेंच्युरियन कसोटीतील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेतली आहे. डी कॉकचा हा निर्णय खूपच आश्चर्यकारक आहे कारण तो केवळ 29 वर्षांचा आहे आणि त्याने क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट खूप लवकर सोडण्याचा निर्णय घेतला. डी कॉकने दक्षिण आफ्रिकेसाठी 54 कसोटीत 3300 धावा केल्या आणि त्याची फलंदाजीची सरासरी 38.83 होती. डी कॉकच्या आपल्या करियरमध्ये 6 कसोटी शतके आणि 22 अर्धशतके केली आहेत.

सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या या यष्टीरक्षकाची कामगिरी निराशाजनक होती. डी कॉकने पहिल्या डावात 34 धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याला केवळ 21 धावा करता आल्या. डिकॉक दोन्ही डावात बोल्ड झाला. डिकॉकच्या अपयशाचा परिणाम दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही झाला. दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाकडून (Team India) पहिल्या कसोटीत 113 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच सेंच्युरियनमध्ये आशियाई संघाकडून कसोटी हरला. त्याचबरोबर या मैदानावरील दक्षिण आफ्रिकन संघाचा हा केवळ दुसरा पराभव आहे.

डीकॉक निवृत्त का झाला?

क्विंटन डी कॉक भारताविरुद्ध दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळणार नव्हता. वास्तविक त्याची पत्नी साशा गरोदर आहे आणि त्यामुळेच डिकॉकने पितृत्व रजा घेतली पण सेंच्युरियन कसोटी संपताच त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. केवळ 29 वर्षीय डेकॉक पुढील 7-8 वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, परंतु त्याने या निर्णयाचे कारण चाहत्यांशी शेअर केले. डी कॉकने कसोटी निवृत्तीनंतर आपले विधान प्रसिद्ध करताना सांगितले की, हा निर्णय त्याच्यासाठी खूप कठीण होता. मात्र, तो एकदिवसीय आणि टी-20 (T-20 Cricket) क्रिकेट खेळत राहणार आहे. डेकॉकने लिहिले, 'हा निर्णय माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. मी माझ्या भविष्याबद्दल खूप विचार केला आणि आता माझी प्राथमिकता साशा आणि माझे बाळ आहे. माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मला माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायात माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

डिकॉकची कसोटी कारकीर्द क्विंटन डी कॉकने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी शतके झळकावली. मात्र, भारताविरुद्ध त्याला 7 कसोटीत 20.14 च्या सरासरीने केवळ 282 धावा करता आल्या. भारताविरुद्धच्या कसोटीत तो सर्वाधिक 3 वेळा शून्यावर बाद झाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT