rinku singh  saam tv
Sports

Rinku Singh Record: राजकारणाचा बळी! रिंकूला संधी न मिळाल्याने फॅन्सचा पारा चढला! सोशल मीडियावर दिल्या अशा प्रतिक्रिया

IND VS WI: संघाची घोषणा होण्यापूर्वी रिंकू सिंगला संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं

Ankush Dhavre

Team India T-20 Squad: वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी युवा फलंदाज तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वालला संधी दिली गेली आहे.

तर आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंगवर दुर्लक्ष केलं गेलं आहे. हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवली गेली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी सुपरस्टार ठरलेल्या रिंकू सिंगला संघात स्थान न मिळणं हा आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे. संघाची घोषणा होण्यापूर्वी रिंकू सिंगला संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. सध्या रिंकू सिंग हा सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघासाठी खेळताना त्याने फिनिशरची भूमिका पार पाडली. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने अंतिम षटकात सलग ५ षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. या खेळीनंतर तो चर्चेत आला होता. रिंकू सिंगने आयपीएल २०२३ स्पर्धेत १४ सामन्यांमध्ये ४७४ धावा केल्या. (Latest sports updates)

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ (INDIA vs WEST INDIES T-20 Series) :

इशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), तिलक वर्मा (Tilak Verma), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

टी-२० मालिका

पहिला टी-२० सामना- ३ ऑगस्ट, ब्रायन लारा क्रिकेट अॅकेडमी, त्रिनिदाद

दूसरा टी-२० सामना- ६ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

तिसरा टी-२० सामना- ८ ऑगस्ट, नॅशनल स्टेडियम, गयाना

चौथा टी-२० सामना- १२ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

पाचवा टी-२० सामना- १३ ऑगस्ट, ब्रोवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल फ्लोरिडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: ५ राज्यात कोणाचं सरकार होणार? विधानसभा निवडणुकांचा धक्कादायक सर्व्हे आला समोर

Daund Firing Case: दौंड गोळीबार प्रकरण; आमदाराच्या भावाला अटक करा; तृप्ती देसाईंची मागणी

फडणवीसांचा शिंदे-दादांना झटका,नगरविकास'च्या उधळपट्टीला फडणवीसांकडून चाप?

Online Gaming Maharashtra: ऑनलाईन रमीच्या नादात घरदार, शेती गमावली; डोक्यावर झालं 80 लाखांचं कर्ज

High BP: हाय बीपीचा त्रास असल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

SCROLL FOR NEXT