virat kohli with babar azam twitter/icc
Sports

Ind vs Pak Memes: 'आमच्या पप्पांनी पाकिस्तान हाणला..',भारत- पाक सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

India vs Pakistan Funny Memes: या सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan Funny Memes:

कोलंबोच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानवर २२८ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने आशिया चषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

भारतीय संघाने पाकिस्तान संघाला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अवघ्या १२८ धावा करता आल्या. दरम्यान पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

भारत- पाकिस्तान क्रिकेटचा सामना महायुद्धापेक्षा कमी नसतो. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येतात त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. कोलंबोच्या मैदानावर देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे.या सामन्यात पावसाने बँटींग केल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. केएल राहुलने १११ तर विराट कोहलीने १२२ धावांची खेळी केली.

भन्नाट मीम्स व्हायरल..

या सामन्यानंतर एका युजरने अनुष्का शर्मा आणि वामिकाचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर 'आमच्या पप्पांनी पाकिस्तान हाणला..' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Latest sports updates)

राखीव दिवशी भारताचा विजय..

हा सामना १० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना २४.१ षटकांचा खेळ होताच पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात आला.

राखीव दिवशी केएल राहुल आणि विराट कोहलीने तुफान फटकेबाजी केली. या डावात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकअखेर ३५७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अवघ्या १२८ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT