Tvesha Jain, chess  saam tv
Sports

Tvesha Jain : राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत 'ग्रीन लॉन्स' च्या त्वेशा जैननं पटकाविलं कास्यपदक

मुंबई येथील ग्रीन लॉन्स प्रशालेत ती शिकत आहे.

साम न्यूज नेटवर्क

Tvesha Jain : अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या सात वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत (National Chess Championship) मुंबईच्या (mumbai) त्वेशा जैन (Tvesha Jain) हिने ब्राॅंझ पदक पटकाविले. या स्पर्धेत त्वेशा जैन हिने नामांकित आणि विशेष म्हणजे मानांकित खेळाडूंना हरवलं आहे. या यशाचे श्रेय त्वेशाने तिच्या पालकांना आणि गुरुजनांना दिलं आहे. (Tvesha Jain Latest Marathi News)

या स्पर्धेत २३ राज्यांतील शेकडाे खेळाडू सहभागी झाले हाेते. यापूर्वी या गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश होता. त्यामुळेच यंदाची स्पर्धा अनुभवी व नवाेदित खेळाडूंसाठी आव्हानात्मक होती.

त्वेशाने अकरा फेऱ्यांमध्ये साडेआठ गुणांची कमाई केली. सहाव्या फेरीत तेलंगणाच्या अमेया अग्रवालविरुद्ध तिने मिळविलेला विजय या स्पर्धेतील आश्चर्यकारक विजय मानला गेला. चार तासांच्या झुंजार लढतीनंतर त्वेशा हिने हा डाव जिंकला. पदक जिंकण्यासाठी शेवटच्या फेरीत त्वेशा हिला विजय अनिवार्य होता. या फेरीत तिच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या संस्कृती यादव (ईएलओ १२५६) हिचे आव्हान होते.

अखेरपर्यंत संयम राखत, चिकाटीनं आणि जिद्दीने त्वेशा हिने हा डाव जिंकून कास्यपदकावर माेहर उमटवली. या स्पर्धेसाठी तिने केलेला सराव स्पर्धेतील विजयासाठी उपयुक्त ठरली आहे. तिने मला पदक मिळवण्याची खात्री होती असे विजयानंतर नमूद केले.

त्वेशाने साडेतीन वर्षांची असताना बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. तिचे वडील आषिश आणि आजोबा रमेश यांच्याकडूनच तिला बुद्धिबळाचं बाळकडू मिळालं आहे. त्यानंतर तिला ज्येष्ठ प्रशिक्षक वीरेश तामिरेड्डी यांचे मार्गदर्शन लाभलं. दररोज चार ते पाच तास ती सराव करते. स्पर्धात्मक डावपेच, बुद्धिबळाविषयी वेगवेगळी कोडी सोडविणे, योगासने व ध्यानधारणा याचा देखील तिच्या सरावात समावेश आहे. मुंबई येथील ग्रीन लॉन्स प्रशालेत ती शिकत आहे. शाळेकडून तिला या खेळासाठी भरपूर सहकार्य मिळत आहे. (Maharashtra News)

त्वेशा नेहमी आक्रमण हाच उत्कृष्ट बचाव असतो हे तत्व डोळ्यासमोर ठेवून खेळते. झटपट आकलन शक्ती ही तिची खासियत असल्यामुळे अभ्यास असो किंवा बुद्धिबळाचे डावपेच सर्वच गोष्टी ती अल्प वेळेतच आत्मसात करते असे तिच्या पालकांनी सांगितलं. (Breaking Marathi News)

त्वेशा हिने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील आयोजिलेल्या अनेक स्पर्धांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. अनेक विश्व विजेते पद मिळवणारा मॅग्नस कार्लसन हा तिचा आदर्श खेळाडू आहे. त्याच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचे तिचे ध्येय आहे. त्याकरिता भरपूर मेहनत करण्याची तिची तयारी असल्याचेही पालकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT