- सचिन कदम
Raigad News : खरवली ग्राम पंचायतीच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीनंतर सरपंचांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड (mahad) एमआयडिसी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. विनापरवाना मिरवणुक, पोलिस अधिकाऱ्यांच्या आंगावर धावुन गेले, जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल साेमवारी लागले. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे (mva) गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे सरपंच झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लाेषात विजयी मिरवणुक काढली. (raigad latest marathi news)
विना परवानगी मिरवणुक काढल्याने पोलिसांनी खरवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच चैतन्य ऊर्फ बाबु म्हामुणकर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पाेलिस कर्मचा-याने दिलेल्या तक्रारीनूसार रविंद्र रामचंद्र नलावडे, रेखा नितीन सकपाळ, श्रुतीका अमोल म्हस्के, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख आदींसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.