Tushar Deshpande all-round performance saam tv
Sports

Tushar Deshpande: संकटात सापडलेल्या टीमसाठी तुषार ठरला तारणहार, अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला विजय

Tushar Deshpande all-round performance: तुषार देशपांडेच्या नाबाद ५५ धावा आणि २ विकेट्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सने बांद्रा ब्लास्टर्सचा २५ धावांनी पराभव केला. टी-२० मुंबई लीग २०२६ मधील हा सामना रंगतदार ठरला.

Surabhi Jayashree Jagdish

तुषार देशपांडेच्या शानदार अष्टपैलू खेळीच्या जोरावर मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या नुवामा प्रायव्हेट टी-२० मुंबई लीग २०२६ मधील सामन्यात बांद्रा ब्लास्टर्सचा २५ रन्सने पराभव केला. या विजयात तुषारने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांत महत्त्वाची भूमिका बजावली.

पहिल्यांदा फलंदाजी करताना तुषारने अवघ्या २५ बॉल्समध्ये नाबाद ५५ रन्सची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. केवळ ३ ओव्हर्समध्ये त्याने फक्त १२ रन्स देत २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तुषारच्या या कामगिरीमुळे रॉयल्स टीमला २०३ रन्सच्या मोठ्या लक्ष्याला डिफेंड करणं शक्य झालं.

२०४ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांद्रा ब्लास्टर्सच्या आघाडीच्या फलंदाजांनी सुरुवातीला चांगली झुंज दिली. टीमचा कर्णधार सुवेद पारकरने ४० चेंडूंमध्ये ५६ रन्सची खेळी करत त्याचा फॉर्म कायम राखला. या स्पर्धेतील हे त्याचं तिसरं अर्धशतक होतं. तर याआधी त्याने एक शतकही झळकावलंय.

या सामन्यात सुवेदला प्रतीक रविशंकरचीही उत्तम साथ मिळाली होती. प्रतीकने २२ चेंडूंमध्ये ४७ रन्स करत टीमला वेगवान सुरुवात करून दिली. यानंतर जय जैनने २३ चेंडूंमध्ये ४६ रन्सची आक्रमक खेळी साकारली.

या तिघांच्या फलंदाजीमुळे बांद्रा ब्लास्टर्स बराच वेळ सामन्यात टिकून राहिली. मात्र हे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर टीमच्या डाव गडगडला. मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. टीममधील तब्बल आठ फलंदाज एकेरी धावसंख्येवर पव्हेलियनमध्ये परतले. रॉयल्सच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांद्रा ब्लास्टर्सचा संपूर्ण टीम १७.५ ओव्हर्समध्ये १७८ रन्सवर बाद झाली.

याआधी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नवाही. डावाच्या पहिल्या पाच ओव्हर्समध्ये टीमच्या ३६ रन्समध्ये ३ विकेट्स पडल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीत अयाझ खान आणि चिन्मय सुतार यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही ३१-३१ रन्सचं योगदान दिलं. मात्र चांगली सुरुवात मिळूनही त्यांना मोठी खेळी करण्यात यश आलं नाही.

टीम अडचणीत असताना तुषार देशपांडेने जबाबदारी स्वीकारली. त्याने संयमाने नाबाद ५५ रन्सची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने तब्बल सहा षटकारांची आतषबाजी केली. त्याला रोहन राजेचीही मोलाची साथ मिळाली. रोहनने २८ रन्सचं योगदान देत तुषारसोबत ७३ रन्सची महत्त्वाची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपच्या जोरावर रॉयल्सने चांगला स्कोर उभारला. आणि २५ रन्सने विजय देखील मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara: शहापूरच्या इंजिनिअर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, बायको अन् मेहुण्याने कट रचत क्रूरपणे संपवलं

Maharashtra News Live Update: नाशिकच्या आंदोलकांकडून भर पावसात उपोषण सुरू

खरा अराजकतेचा चेहरा उघडा पडला; मुख्यमंत्र्यांची CJP आंदोलनावर टीका|VIDEO

महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन

नाफेडची थेट बाजार समितीतून कांदा खरेदी, सहकारी संस्थांनाही व्यापारी परवाने मिळणार

SCROLL FOR NEXT