Turkish football club Twitter X
Sports

Turkey Referee Punched: फुटबॉलचं मैदान की WWFचं; लाइव्ह मॅचमध्ये संघ मालकाचा रेफ्रीला जोरदार 'पंच'

Turkish football club : फुटबॉल खेळावर प्रेम करणारे करोडो चाहते आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते. अगदी क्रिकेटच्या सामन्यांसारखं सामन्यांमध्ये थरार आणि झुंज पाहायला मिळते. या खेळातील खेळाडूदेखील एकमेकांना खुन्नस देत असतात. तुर्कीमधील एका सामन्याचा एक असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एका संघाच्या मालकाने भर मैदानात थेट रेफ्रीला पंच मारलाय.

Bharat Jadhav

Turkish Football Club President Punching Referee :

जगभरात फुटबॉलचा खेळ खेळला जातो आणि फुटबॉल खेळावर प्रेम करणारे करोडो चाहते आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असते. अगदी क्रिकेटच्या सामन्यांसारखं सामन्यांमध्ये थरार आणि झुंज पाहायला मिळते. या खेळातील खेळाडूदेखील एकमेकांना खुन्नस देत असतात. असाच काहीसा प्रकार तुर्कीमध्ये सध्या सुरू असलेल्या तुर्की सुपर फुटबॉल लीगच्या सामन्यात पाहायला मिळाला. (Latest News)

तुर्कीची राजधानी अंकारा येथील एरीमन स्टेडियमवर कैकूर रिझस्पोर आणि अंकीरागुकू या संघात सामना चालू होता. हा सामना चालू असताना एका फुटबॉल क्लबच्या मालकाने लाइव्ह सामन्यात रेफ्रीला जोरदार पंच मारला. त्यानंतर खाली पडलेल्या रिफेरवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फुटबॉलचा सामना आहे का WWFचा असा प्रश्न अनेकांना पडलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुर्की सुपर लीग फुटबॉल सामन्यात रेफ्रीला संघ मालक मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कैकूर रिझस्पोरआणि अंकीगुकू संघ एकमेंकाना जोरदार टक्कर देत होते. दोन्ही संघाने एक-एक गोल केल्याने हा सामना ड्रा म्हणजेच अनिर्णयीत झाला. सामना ड्रा झाल्याने कैकूर रिझस्पोर संघाचा मालक फारुक कोकाला राग आला. रागाच्या भरात संघ मालक मैदानात घुसला आणि त्याने थेट रेफ्रीला जोरदार बुक्का मारला.

या सामन्याच्या ९७ व्या मिनिटाला कैकूर रिझस्पोरच्या खेळाडूने गोल केला. यानंतर सामना १-१ असा बरोबरीत आला. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही. सामना अनिर्णित राहिल्यानंतर कैकूर रिझस्पोरचे चाहते रागाच्या भरात मैदानात घुसले. कैकूर रिझस्पोरचे मालकही मैदानात आले. ते थेट रेफ्रीकडे गेले आणि त्यांनी रेफ्रीला मारहाण सुरू केली. या मारहाणी रेफ्री जखमी झाले असून त्यांना उचलून ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. दरम्यान कैकूर रिझस्पोरच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कैकूर रिझस्पोरच्या क्लब मालकाला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी त्याला २ दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT