trent boult catch twitter
Sports

Trent Boult Catch: बाऊंड्रीवर ट्रेंट बोल्टचा भन्नाट कॅच! VIDEO पाहुन येईल ख्रिस लिनच्या कॅचची आठवण

New Zealand vs Netherland: बाऊंड्रीवर ट्रेंट बोल्टने भन्नाट झेल घेतला आहे,ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Trent Boult Catch Viral Video:

न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्याने अनेकदा न्यूझीलंड संघाला सामने जिंकून दिले आहेत. तसेच क्षेत्ररक्षणात देखील त्याने मोलाचं योगदान दिलं आहे. दरम्यान वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, न्यूझीलंड संघाची गोलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी रचिन रविंद्र गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर बास डी लिडेने मोठा फटका खेळला.

त्याने हा फटका इतका जोरदार मारला होता की, चेंडू सीमारेषेच्या पार जाणारच होता. इतक्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या ट्रेंट बोल्टने सुपरमॅन स्टाईल उडी मारली आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान तो सीमारेषेच्या बाहेर गेला होता. मात्र त्याने चेंडू आत फेकला आणि बाहेर जाऊन परत आत येत हा झेल टिपला. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक जिंकून नेदरलँडने न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करताना विल यंग, रचिन रविंद्र आणि टॉम लेथमने अर्धशतकं झळकावली. विल यंगने ७० धावा ठोकल्या. तर रचिन रविंद्रने ५१ आणि टॉम लेथमने ५३ धावा केल्या.

या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ३२२ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडला अवघ्या २२३ धावा करता आल्या. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ९९ धावांनी विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

SCROLL FOR NEXT