pro kabaddi auctions twitter
Sports

PKL Auctions, Day 1: या खेळाडूंवर फ्रेंचायझींनी पाडला पैशांचा पाऊस! पाहा सर्वाधिक बोली लागलेले टॉप 5 खेळाडू

Top Buys In Day 1 Of Pro Kabaddi Season 11 Auctions: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामातील लिलावाला सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्या दिवशी कोणते खेळाडू सर्वात महागडे ठरले? जाणून घ्या.

Ankush Dhavre

प्रो कबड्डी २०२४ स्पर्धेच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावाच्या पहिल्या दिवशी खेळाडूंवर मोठी बोली लागली. पहिल्याच दिवशी फ्रेंचायझींनी स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी पैसा ओतला. सचिन पासून ते पवन सेहरावत यांच्यावर कोट्यवधींची बोली लागली. दरम्यान कोण आहेत पहिल्या दिवशी सर्वात मोठी बोली लागलेले खेळाडू? जाणून घ्या.

सचिन तन्वर

सचिन या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तेलुगूने पहिलीच बोली ७० लाखांची लावली. त्यानंतर गुजरात आणि युपीने देखील सचिनला आपल्या संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला. बोली वाढता वाढता इतकी वाढली की, ती जाऊन २ कोटींवर पोहोचली. शेवटी तमिळ थलाईवाजने त्याला २.१५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं.

मोहम्मदरेजा शादलू

इराणचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मदरेजा शादलूला हरियाना स्टिलर्सने आपल्या ताफ्यात स्थान दिलं आहे. या संघाने त्याला २.०७ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. गेल्या हंगामात त्याच्यावर २.३५ कोटींची बोली लावण्यात आली होती. या लिलावात बोली लागलेला तो पहिलाच खेळाडू ठरला. त्याला आपल्या संघात स्थान देण्यासाठी जवळपास सर्वच संघांमध्ये स्पर्धा रंगली. शेवटी हरियाना स्टिलर्सने बाजी मारली आणि त्याला आपल्या संघात स्थान दिलं.

गुमान सिंग

गुमान सिंगला गुजरात जायंट्सने १.९७ कोटींची किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे. गुमान सिंगला आपल्या संघात घेण्यासाठी जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. शेवटी त्याच्यावर १.९७ कोटींची बोली लागली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १८ सामन्यांमध्ये १६३ गुणांची कमाई केली आहे.

पवन सेहरावत

गेल्या हंगामात पवन सेहरावतवर यावेळीही मोठी बोली लागली होती. या लिलावात त्याला तेलुगू टायटन्सने १.७२५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र तेलगूने FBM चा वापर करत त्याला पुन्हा एकदा आपल्या संघात घेतलं.

भरत हुड्डा

भरत हुड्डाला आगामी हंगामासाठी युपी योद्धाने आपल्या संघात स्थान दिले आहे. त्याला १.३ कोटींची बोली लावत संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने गेल्या हंगामात १०३ गुणांची कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT