Tokyo Olympics Twitter
Sports

Tokyo Olympics: कुस्तीमध्ये रवीला रौप्य तर दिपक पुनिया चितपट

आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू रवी दहियाचा 57 किलो वजनी फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत विश्वविजेत्या रशियन झावूरने पराभाव केला आहे.

वृत्तसंस्था

दिपक पुनियाचा (Dipak Punia) 86 किलो वजनी गटात कांस्य पदाकासाठी झालेल्या सामन्यात पराभव झाला. 4-2 असा पराभव त्याला स्वीकारावा लागला. सॅन मॅरिनोच्या माईल्सने पुनीयाला आसमान दाखवत कांस्य पदक जिंकले. दरम्यान दिपक पुनियाला 86 किलो वजनी गटात उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या डेविड मॅरिसने सहज हरवले होते. टेलरच्या कलात्मक प्रतिभेसमोर पुनीयाचा टिकाव लागला नव्हता. पुर्व उपांत्य फेरीच्या सामन्यात पुनीयाने चीनच्या पैलवानाला 6-3 ने हरवले होते. आज त्याचा मुकाबला माईल्स अमिलशी पार पडला.

या सामन्याच्या अगोदर झालेल्या सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी दहियाचा 57 किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत विश्वविजेत्या रशियन झावूरने पराभव केला. 7-4 असा रवीचा पराभव झाला आहे. त्यामुळे रवीला रैप्य पदकावर समाधान मानावे लागले. रवी दहिया हा सामना जिंकण्यात यशस्वी झाला असता तर भारताला टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पहिले सुवर्णपदक आणि कुस्तीमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक झाले असते. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार अंतिम फेरीत पराभूत झाला होता, ज्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय चाहत्यांना कुस्तीपटू रवी दहियाकडून सुवर्णपदक जिंकण्याच्या मोठ्या आशा होत्या.

1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारताला कुस्तीमध्ये पदक मिळवून देणारे के डी जाधव हे पहिले कुस्तीपटू होते. त्यानंतर सुशीलने बीजिंगमध्ये कांस्य आणि लंडनमध्ये रौप्यपदक जिंकले होते. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक स्पर्धा पदके जिंकणारा सुशील एकमेव भारतीय होता. परंतु बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य जिंकून बरोबरी साधली. योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. दुसरीकडे, साक्षी मलिकने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT