टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) च्या पुरुष हॉकी पूल-ए सामन्यात भारताने स्पेनला 3-0 (IND vs Spain) ने पराभूत करून पुनरागमन केले आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन गोल केल्यावर भारताने स्पेनला सामन्यात गोल करण्याची संधी दिली नाही. चौथा उपांत्यपूर्व सामना भारतीय संघाने 3-0 जिंकत आपल्या खिशात टाकला. सामन्यात स्पेनला जवळपास 8 पेनल्टी कॉर्नर मिळाले परंतु त्यांना गोल करता आला नाही.
पहिल्याच क्वार्टरमध्ये भारतीय संघाने आधीच आघाडी घेतली होती. पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटांत भारताने शानदार कामगिरी केली. भारताकडून सिमरनजित सिंगने 14 व्या मिनिटाला तर रुपिंदर सिंगने 15 व्या मिनिटाला गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये कोणताहा संघ गोल करु शकला नाही. दरम्यान स्पेनने खूप आक्रमक खेळ केला. परंतू त्यांना एकही गोल करता आला नाही.
26 जुलै (सोमवार) जर्मनी आणि भारतीय महिला संघ यांच्यात झालेल्या सामन्यात भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात भारतीय संघाने बर्याच संधी निर्माण केल्या पण त्यांना त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. कर्णधार नायके लोरेन्झने 12 व्या मिनिटाला जर्मनीकडून पहिला गोल केला. यानंतर दुसरा क्वार्टरमध्ये गोल झाला नाही.
अॅने कटारिना श्रोडरने 35 व्या मिनिटाला जर्मनीकडून सामन्यातला दुसरा गोल केला. टोकियो ऑलिम्पिकमधील हा दोन्ही संघांसाठीचा त्यांचा दुसरा सामना होता. तत्पूर्वी, भारताला वर्ल्ड नंबर 1 संघ नेदरलँड्सविरूद्ध 5-1 असा पराभव पत्करावा लागला होता. तर जर्मनीने पहिल्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरुद्ध 2-1 असा विजय नोंदविला होता.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.