मिराबाई चानूने (Chanu Saikhom Mirabai) टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२० (Tokyo Olympics) वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत विक्रम रचला आहे. तिने ४९ किलो वजनी गटात खेळत असताना रौप्यपदकाची कमाई करीत देशासाठी पहिलं पदक जिंकलं आहे. या कामगिरीनंतर मिराबाईवर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. इतकेच नव्हे तर तिच्यासाठी मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N. Biren Singh Chief Minister of Manipur) यांनी एक कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. तिला नव्या सरकारी नोकरीची ऑफर दिली जाणार असल्याचेही बोलले जात होते. मिराबाई आता मणिपूरच्या पोलीस विभागात काम पाहणार आहे.
ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मणिपूर सरकारने मिराबाईला अतिरिक्त पोलीस अधीक्षक पद दिले आहे. मणिपूरच्या या महिलेने एकूण २०२ किलो वजन उचलून आत्मविश्वास कुठेही कमी पडू न देता देशासाठी पदक जिंकले आहे. तिने ८७ किलो स्नॅच प्रकारात तर ११५ किलो क्लीन अॅण्ड जर्क प्रकारात वजन उचलून ही कामगिरी केली आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व भरपूर कौतुक केलं. मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहिर करुण तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार भारतात परतताच मणीपूर सरकारनं मीराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रिडा) या पदावर नियुक्ती केली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.