Indian Team Two Match On Same Day saam tv
क्रीडा

Team India: आज एकाच दिवशी दोन सामने खेळणार भारत; दोन्ही मॅचमध्ये केवळ अर्ध्या तासाचा फरक, पाहा कशी खेळणार टीम इंडिया?

Indian Team Two Match On Same Day: आज टीम इंडियाला दोन सामने खेळायचे आहेत. मुख्य म्हणजे आजच्या दिवशी खेळल्या जाणाख्या या दोन सामन्यांमध्ये अवघ्या अर्ध्या तासाचा फरक आहे.

Surabhi Jagdish

आज ९ ऑक्टोबर असून टीम इंडियाला दोन सामने खेळायचं आहे. मुख्य म्हणजे या दोन सामन्यांमध्ये केवळ अर्ध्या तासाचा फरक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, टीम इंडिया हे दोन्ही सामने खेळणार कशी. पहिला सामना पुरुषांचा आहे तर दुसरा सामना वर्ल्डकपमध्ये महिलांचा आहे.

कसे आहेत टीम इंडियाचे सामने

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सध्या टी-२० सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील दुसरा सामना आज संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा महिलांच्या टी-२० वर्ल्डकपमधील असून संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे.

भारत विरूद्ध बांगलादेश

बांगलादेशाविरूद्धच्या टी-२० सिरीजमध्ये टीम इंडियाने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर या सिरीजमधील आज दुसरा सामना रंगणार आहे.

भारत विरूद्ध श्रीलंका

महिला टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने खेळले आहेत. आता टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये महिलांनी न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT