tilak verma dedicates his half century to his parents by showing tattoo in asian games semifinal video viral  twitter
क्रीडा

Tilak Verma Celebration: जिंकलस भावा! बायको, प्रेयसी नाहीतर आई-वडिलांसाठी मैदानात खास सेलिब्रेशन

Asian games 2023, India vs Bangladesh: या सामन्यात अर्धशतक झळकावताच तिलक वर्मा हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

Tilak Verma Celebration After Half Century:

भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. तर चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरूष क्रिकेट संघाने सेमीफायनलच्या सामन्यात बांगलादेशला धुळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे.

या सामन्यात युवा फलंदाज तिलक वर्माने तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर तो हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Tilak verma tattoo celebration)

तिलक वर्माचं हटके सेलिब्रेशन..

बांगलादेशने दिलेल्या ९७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. या डावात त्याने २६ चेंडूंचा सामना करत नाबाद ५५ धावांची खेळी केली.

यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नॉक आऊटमध्ये अर्धशतक झळकावणारा युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. अर्धशतक पूर्ण करताच तो हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

त्याने टी-शर्ट वर केलं आणि पोटावर असलेला आई वडिलांचा टॅटू दाखवला. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. तसेच नेटकरी देखील या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद ९६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडायला सुरूवात केली.

गेल्या सामन्यातील शतकवीर यशस्वी जयस्वाल या सामन्यात शून्यावर माघारी परतला. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (Latest sports updates)

त्याने २६ चेंडूंचा सामना करत ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५५ धावा ठोकल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दिलेलं आव्हान ९.२ षटकात पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT