'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारतीय पत्नीला आणि मुलीला धमकी
'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारतीय पत्नीला आणि मुलीला धमकी Twitter/ @Hasanali
क्रीडा | IPL

'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारतीय पत्नीला आणि मुलीला धमकी

वृत्तसंस्था

टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. सलग पाच गट सामने जिंकून उपांत्य फेरी गाठलेल्या संघाचे एका पराभवाने विजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे. अखेरच्या षटकात सामना जिंकून देणारी खेळी खेळणाऱ्या मॅथ्यू वेडचा झेल सोडणारा हसन अली हे या पराभवाचे कारण असल्याचे मानले जात आहे. या पराभवानंतर हसनसह त्याच्या भारतीय पत्नीलाही लक्ष्य केले जात आहे.

टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 गड्यांच्या मोबदल्यात 176 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 5 गडी राखून लक्ष्य गाठले आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. 18.3 षटकात हसन अलीकडून मॅथ्यू वेटचा झेल सुटला, त्यानंतर त्याने सलग तीन षटकार मारून सामना संपवला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीला सतत धमक्या येत आहेत. त्याने भारताची सामिया आरजू हिच्याशी लग्न केले आहे. दोघांना एक लहान मूलही आहे. आता पराभवामुळे नाराज काही चाहते हसनसह त्याची मुलगी आणि पत्नीवर निशाणा साधत आहेत. या धमक्यांमुळे सामिया नाराज आहे. आपल्या मुलीसोबत भारतात येणार असल्याची चर्चाही त्यांनी सोशल मीडियावर केली होती.

सामियाने ट्विटमध्ये लिहिले की, काही निर्लज्ज पाकिस्तानी चाहत्यांनी आमच्या मुलीलाही लक्ष्य केले आणि तिला इजा करण्याची धमकी दिली. जर इथे पाकिस्तानात मला आमच्या सुरक्षेसाठी उच्च अधिकार्‍यांकडून कोणतेही आश्वासन मिळाले नाही, तर मी सुरक्षेसाठी हरियाणामध्ये माझ्या पालकांकडे जाणार आहे. सामियाने तिच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, "मी पाकिस्तानच्या लोकांना आवाहन करते की, मी भारतीय असले तरी रॉ ची गुप्तहेर नाही. माझ्या पतीने शिया असल्यामुळे कॅच सोडला नाही, त्यामुळे आपण आम्हाला सुरक्षित राहू द्या आणि आमच्यावर हल्ला करू नका."

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

Nasim Khan News : कॉंग्रेसचं नाराजीनाट्य शमलं! नसीम खान यांच्या खांद्यावर नवीन जबाबदारी..

Shriniwas Pawar News : तर अजित पवारांनी आताच मिशी काढावी, बंधू श्रीनिवास यांची प्रतिक्रिया

Beed News : एटीएम मशीनच नेले चोरून; अंबाजोगाई शहरातील मध्यरात्रीची घटना

SCROLL FOR NEXT