IPL 2022 Saam TV
क्रीडा

IPL चाहत्यांच्या पदरी निराशा, केंद्र सरकारच्या पत्रामुळे, ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय?

यावेळीचे IPL सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईतील स्टेडियमवर रंगणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बंद झालेला आयपीएल स्टेडियमचा दरवाजा यावेळी उघडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या च्या 15 व्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना, कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे यावेळचे सामने देखील प्रेक्षकांविना (Without Audience) रंगतात की काय अशी शंका यायला लागली आहे, कारण एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाबाबत (Corona) सावधानतेचा इशारा देणारे पत्र पाठवून काळजी घेण्याचे सुचविले आहे. त्यामुळे आयपीएल पुन्हा एकदा प्रेक्षकांविना रंगण्याची चर्चा रंगू लागली आहे.

यावेळचे आपीएल सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईतील स्टेडियमवर (Pune And Mumbai Stadium) रंगणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बंद झालेला आयपीएल स्टेडियमचा दरवाजा यावेळी उघडणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांसाठीची परवानगी महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला (BCCI) दिली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांमुळे यावेळचे सामने देखील प्रेक्षकांविनाच पार पडतात की काय अशी शंका उपस्थित झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंज नाराजी पसरली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नव्या कोविड -19 च्या विषाणू संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण कोरियासह चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून. भारतात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. त्यातच यंदा IPLचे 55 साखळी सामने मुंबईत, तर 15 सामने पुण्यात खेळविण्यात येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारकडून याबाबतचे पत्र मिळाले असल्याची माहिती दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT