virat kohli saam tv
Sports

Virat Kohli: 'हा माझा शेवटचा वर्ल्डकप..' डोळ्यांत अश्रू, भावनांना बांध घालून विराटची मोठी घोषणा

Virat Kohli Statement, IND vs SA Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली, सामन्याचा सामनावीर ठरला आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने मोठी घोषणा केली आहे.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ' हा माझा शेवटचा वर्ल्डकप होता. मला हेच साध्य करायचं होतं. संघाला जेव्हा गरज होती. तेव्हा मी संघासाठी माझं काम पूर्ण केलं. ' यासह त्याने युवा खेळाडूंचाही उल्लेख केला. यापुढील टी -२० वर्ल्डकप २०२६ मध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली जाईल असं विराट म्हणाला.

फायनलमध्ये महत्वपूर्ण खेळी..

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाला नवीन रोल देण्यात आला होता. यापूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. मात्र या स्पर्धेत त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली गेली. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आणि सुपर ८ फेरीतील सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. मात्र फायनलमध्ये त्याची जादू पाहायला मिळाली. फायनलमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना विराट कोहलीने अक्षर पटेलसोबत मिळून डाव सांभाळला. त्याने ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

अशी राहिली टी -२० कारकिर्द

विराट कोहलीच्या टी - २० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला १२५ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ४८.६९ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राइक रेटने ४१८८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३८ अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे ग्रँड टूरसाठी 130 किलोमीटर शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT