Hardik Pandya, Rohit Sharma, Suryakumar Yadav, Tilak Varma  SAAM TV
क्रीडा

Mumbai Indians mistakes : हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सचं यंदा चुकलं तरी कुठं? नेमक्या गोष्टी समजून घ्या!, VIDEO

Nandkumar Joshi

विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा, अष्टपैलू खेळाडू आणि तरूण नेतृत्व हार्दिक पंड्या, यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह यांसारखे दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पार ढेपाळला. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या उरल्यासुरल्या आशाही आता संपल्यात जमा आहेत. कोलकातानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्येच पराभूत केलं. हार्दिकच्या नेतृत्वात ११ पैकी ८ सामन्यांत पराभव झालाय. पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचं यंदाच्या आयपीएलमध्ये नेमकं चुकलं कुठं? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात इतकी वाइट परिस्थिती कधीही मुंबई इंडियन्सवर ओढवलेली नव्हती. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात ११ पैकी ८ सामन्यांत संघाला पराभवाला तोंड द्यावं लागलंय. काल तर नको तो आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना न आवडणारा असा इतिहास घडला. १२ वर्षांनी कोलकातानं वानखेडेवर मुंबईला पराभवाची धूळ चारली.

इरफान पठान हार्दिकबद्दल काय म्हणाला?

मुंबई इंडियन्सचा संघ कागदावर लय भारी दिसतोय. पण रणनीती फसली. या संघाचा योग्य वापर केलेला दिसत नाही, असं सांगतानाच भारताचा दिग्गज क्रिकेटपटू इरफान पठाननं तर हार्दिकच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केलीय. जे प्रश्न त्याच्या नेतृत्वावर उपस्थित केले होते, ते खरेच आहे, असं तो म्हणाला.

इरफान पठाननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि मुंबई इंडियन्सच्या खेळाची चीरफाडच केलीय.

केकेआरनं १६९ धावांपर्यंत मजल मारली. व्यंकटेश अय्यरनं चांगला खेळ केला. ५२ चेंडूंत ७० धावांची खेळी केली. मनीष पांडेनंही साथ दिली. ३१ चेंडूंत ४२ धावा केल्या. कोलकाताच्या ५७ वर ५ विकेट होत्या. तरीही मुंबई इंडियन्सनं सहाव्या गोलंदाजाला सलग तीन षटकं दिली आणि तिथंच चुकलं, असं पठाननं सांगितलं.

तुम्ही प्रमुख गोलंदाजांच्या हाती चेंडू सोपवायला हवा होता. पण सहाव्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला. सलग तीन षटके टाकून घेतली. तिथंच अय्यर आणि पांडेनं भागीदारी रचली. केकेआरला १५० वरच गुंडाळायला हवं होतं, पण १७० धावा केल्या. हाच फरक महागात पडला, असंही पठान म्हणाला.

मिशेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा प्लेअर आहे. त्याला मिळालेल्या किंमतीला अखेर न्याय दिला. मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅचविनिंग आकडा गाठलाच. सूर्यकुमारसह चार विकेट घेतल्या. वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, याकडंही पठाननं लक्ष वेधलं.

कोलकाता सगळ्यात डेंजर संघ ठरेल!

कोलकाता संघाच्या पुढच्या वाटचालीबद्दलही पठान बरंच काही बोलला. कोलकाता संघ आता सगळ्यात धोकादायक ठरू शकतो. कारण मिशेल स्टार्क जबरदस्त फॉर्मात आलाय. टीम डेविडला त्यानं ज्या प्रकारे बाद केलं, ते कौतुकास्पद होतं, असंही पठान म्हणाला.

कोलकाता संघानं गुणतालिकेत जबरदस्त झेप घेतलीय. दुसऱ्या स्थानी संघ पोहोचलाय. १० सामन्यांपैकी सात सामने जिंकलेत.

मुंबई इंडियन्स एकजूट होऊन खेळल्याचे दिसले नाही. मैदानात तसं काही दिसून आलं नाही. जे काही कारण आहे, ते शोधावं लागेल. त्यावर योग्य पद्धतीने काम करावे लागेल, असा सल्लाही इरफान पठाननं दिला.

हार्दिकची पोलखोल, खेळाडूंनाही आरसा दाखवला

क्रिकेटमध्ये संघाचं व्यवस्थापन करण्यासाठी कर्णधारपद खूप महत्वाचं आणि परिणामकारक असतं. पण तसं दिसून आलं नाही. मुंबई इंडियन्समध्ये तालमेळ दिसला नाही. एकजूट दिसली नाही. या गोष्टींवर अधिक लक्ष द्यायला हवं. संघाच्या खेळाडूंनी कर्णधाराचा आदर करायला हवा. हे खूपच महत्वाचं आहे, असंही पठान म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT