gautam gambhir twitter
Sports

IND vs SL, 1st ODI: पहिल्याच वनडेत गौतम गंभीरचा हा निर्णय चुकला! इथंच टीम इंडियाने सामना गमावला

Reason Behind Team India Defeat: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना बरोबरीत समाप्त झाला आहे. दरम्यान या सामन्यात गौतम गंभीरने एक चुकीचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या वनडे मालिकेची सुरुवात अनपेक्षित पद्धतीने झाली आहे. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाला सोपा विजय मिळवण्याची संधी होती. हा सामना जिंकायला अवघ्या २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हा सामना बरोबरीत समाप्त झाला आहे. दरम्यान हा सामना भारतीय संघाच्या हातून जाण्याची नेमकी कारणं काय? जाणून घ्या.

चांगली सुरुवात, मधल्या फळीतील फलंदाज फ्लॉप

हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या रोहित शर्माने आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करुन दिली होती. १० महिन्यांनंतर वनडेत कमबॅक करत असलेल्या रोहितने ५८ धावांची शानदार खेळी केली. गिलने १६ धावा केल्या. दोघांनी मिळून ७५ धावा जोडल्या. मात्र पुढील १५५ धावांवर भारताचे १० फलंदाज बाद होऊन माघारी परतले.

गौतम गंभीरचा हा निर्णय चुकला

या सामन्यादरम्यान गौतम गंभीरचा एक निर्णय चुकला आहे. कोलंबोची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे श्रीलंकेकडून फिरकी गोलंदाजी आक्रमण सुरु होतं. अशावेळी विकेट्स पडत असताना, चौथ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला आला. या सामन्यासाठी शिवम दुबेचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामुळे फिरकी गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यासाठी शिवम दुबे वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकला असता. मात्र गंभीरने त्याला आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. त्यामुळे त्याला खालच्या फळीतील फलंदाजांसोबत फलंदाजी करावी लागली. त्यामुळे त्याला मोठे फटके खेळता आले नाही.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना टीचून फलंदाजी करता आली नाही. शेवटी हा सामना बरोबरीत समाप्त झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT