afghanistan twitter
Sports

World Cup Points Table: अफगाणिस्तानच्या विजयानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर! या ३ संघांचं टेन्शन वाढलं

World Cup Points Table: अफगाणिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर केला आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023 Points Table:

अफगाणिस्तान संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. या संघाने एकापाठोपाठ एक ३ वर्ल्डकप विजेत्या संघांना हरवलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अफगाणिस्तानचा संघ आता पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे.

या विजयानंतर अफगाणिस्तानचे ६ पॉइंट्स आणि नेट रन रेट -०.७१८ वर जाऊन पोहोचला आहे. तर श्रीलंकेचा संघ ४ पॉइंट्ससह सहाव्या आणि ४ पॉईंट्ससह पाकिस्तानचा संघ सातव्या स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानच्या विजयाने श्रीलंका आणि पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

असे आहेत टॉप ४ संघ..

अफगाणिस्तानच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये टॉप ४ संघांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. यजमान भारतीय संघ १२ पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. तर १० पॉइंट्ससह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ८-८ पॉइंट्ससह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत ३ विजय मिळवत अफगाणिस्तानने ६ पॉईंट्ससह पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. श्रीलंकेचा संघ ४ पॉइंट्ससह सहाव्या स्थानी, ४ पॉइंट्ससह पाकिस्तानचा संघ सातव्या स्थानी, ४ पॉइंट्ससह नेदरलँडचा संघ आठव्या स्थानी आहे.

बांगलादेश आणि इंग्लंडला या स्पर्धेत केवळ १ सामना जिंकता आला आहे. प्रत्येकी २-२ पॉइंट्ससह बांगलादेशचा संघ नवव्या आणि इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानी आहे.

अफगाणिस्तानने आतापर्यंत ३ मोठ्या संघांवर विजय मिळवला आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ६९ धावांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला होता. आता श्रीलंकेवर अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

SCROLL FOR NEXT