indian cricket team twitter
Sports

Team India News: टीम इंडियाच्या या ३ खेळाडूंना सुपर ८ मध्ये संधी मिळणं कठीण! संपूर्ण स्पर्धेत बसावं लागेल बाहेर

Team India, Super 8: भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान ३ असे खेळाडू आहेत ज्यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना २० जून रोजी होणार बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान भारतीय संघात ३ खेळाडू असे आहेत ज्यांना सुपर ८ फेरीतील एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. कोण आहेत ते ३ खेळाडू? जाणून घ्या.

संजू सॅमसन -

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली होती. त्याची हीच कामगिरी पाहता त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. या सर्व सामन्यांमध्ये रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान दिलं गेलं आहे. त्यामुळे पुढील सामन्यांमध्येही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

युजवेंद्र चहल-

युजवेंद्र चहलला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र आतापर्यंत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय संघाकडून रविंद्र जडेजा खेळणार हे जवळजवळ निश्चित आहे. यासह फिरकीपटू कुलदीप यादवला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. युजवेंद्र चहल हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. असं असलं तरीदेखील त्याला संपूर्ण स्पर्धेत बाकावर बसून राहावं लागणार आहे.

अक्षर पटेल-

डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला साखळी फेरीतील सामन्यांमध्ये संधी दिली गेली होती. त्याला गोलंदाजीसह वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचीही संधी मिळाली. मात्र सुपर ८ च्या सामन्यांमध्ये कुलदीप यादवला फिरकी गोलंदाज म्हणून स्थान दिलं जाऊ शकतं. तर रविंद्र जडेजाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे अक्षर पटेलला आता बाकावर बसण्याची वेळ येऊ शकते.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT