ICC ODI WORLD CUP 2023: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठीचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामन्या येत्या १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.
मात्र पाकिस्तानचा संघ भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार की नाही, हे अजुनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी पाकिस्तानचा संघ भारतात येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तानचे क्रीडामंत्री एहसान मजारी यांनी जिओ न्युजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'भारताने नेहमीच सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. आशिया चषक स्पर्धेतच बघा, इतर संघ पाकिस्तानात येण्यासाठी तयार आहेत. केवळ भारताने नकार दिला आहे. आता आम्ही देखील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु शकतो. भारतात देखील रोज हिंसाचार होतात. असं असताना आम्ही वर्ल्ड कप खेळण्यासाठी खेळाडूंना भारतात कसं पाठवणार. माझं म्हणणं इतकच आहे की, जर भारताला आशिया चषक हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचा असेल, तर आम्हालाही वर्ल्ड कप हायब्रिड मॉडेलमध्ये खेळायचा आहे.' (Latest sports updates)
पाकिस्तानचा संघ भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी जाणार की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारत-पाकिस्तान सामना होण्याआधी बिलावल भुट्टो यांच्या अध्यक्षतेखालील तपास पथक अहमदाबाद येथे पाठवण्यात येणार आहे. याबाबत बोलताना बिलावल भुट्टो यांनी म्हटले की 'वर्ल्ड कप सुरू व्हायला अजुन खुप वेळ आहे.
ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे आताच सामन्याच्या ठिकाणाबद्दल चर्चा केली जाऊ शकत नाही. भारत- पाकिस्तान सामना हा महत्वाच्या सामन्यांपैकी एक आहे.
पाकिस्तानचा संघ भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी येण्यास नकार देताना दिसुन येत आहे. मात्र वर्ल्डकप ही बीसीसीआयची नव्हे तर आयसीसीची स्पर्धा आहे. त्यामुळे पाकिस्तानला माघार घेणं महागात पडु शकतं. पाकिस्तानला आपलं सदस्यत्व देखील गमवावं लागु शकतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.