Umran Malik Saam Tv
Sports

फळ विक्रेत्याचा मुलगा असा झाला ‘वेगवान गोलंदाज’, जाणून घ्या उमरान मलिकची कहाणी

गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या हार्दिक पांड्यालाही उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगाचा अंदाज आलेला नाही.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या हार्दिक पांड्यालाही उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगाचा अंदाज आलेला नाही. उमरानच्या गोलंदाजीचा मार खाण्याची वेळ त्याच्यावरही आली होती, दोनच दिवसांअगोदर सनरायझर्स हैदराबाद (Hyderabad) आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये (Team) सामना झाला. यामध्ये गुजरातने विजय मिळवला होता. पण चर्चा झाली ती उमरान मलिकच्या गोलंदाजीची.

या सामन्यात उमरान मलिकने ४ षटकांत २५ धावा देत ५ विकेट घेतले. त्यापैकी ४ विकेट त्याने क्लिन बोल्ड करून म्हणजेच त्रिफळा उडवून घेतला आहे. केवळ २२ वर्षे वय असलेल्या उमरान मलिकने आपल्या पहिल्या सामन्यापासूनच आपल्या कामगिरी उत्तम सुरु केली. सामन्यापासूनच त्याने 150 किमी प्रतितासच्या वर वेगाने गोलंदाजी केली आहे. यंदाच्या आयपीएल (IPL) स्पर्धेत उमरान मलिकने १५३.३ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून आयपीएलमधील सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनण्याचा विक्रम त्याने केला आहे. त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.

हे देखील पाहा-

उमरान मलिक नेमका कोण आहे, त्याचा आज पर्यंतचा प्रवास कसा राहिला, याची माहिती आपण आज घेणार आहोत -

मूळचा तो जम्मू-काश्मीरचा असलेला उमरान मलिक जम्मू शहरात राहतो. त्याचे वडील अब्दुल रशीद हे शहरातच फळ आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. उमरान हे अब्दुल रशीद यांचं सर्वात लहान मुलगा. लहानपणापासूनच उमरानला क्रिकेटची प्रचंड आवड होती. दिवसदिवस तो बॅट-बॉल पकडून क्रिकेट खेळत असायचा. त्याच्या आई सीमा मलिक म्हणतात की, "दिवसभर क्रिकेट खेळताना बघून आम्ही त्याला रागवायचो. तेव्हा तो म्हणायचा, मी कोणतंही वाईट काम करत नाहीये. मी फक्त क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट खेळताना त्याला तहान-भूक याची कशाचीच काळजी नसायची,''

हैदराबादच्या टीममध्ये निवड कशी झाली?

हैदराबाद संघ त्यावेळी एका जखमी वेगवान गोलंदाजाच्या बदल्यात नवा खेळाडू शोधत होता. त्यावेळी उमरान मलिक डेव्हिड वॉर्नरला गोलंदाजी करत असे. त्यालाही उमरानचा वेग आणि अचूक टप्पा यामुळे सराव करताना त्रास होत होता. उमरानची ही कामगिरी पाहून हैदराबाद संघाने त्याला सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला. उमरानला टी. नटराजन याच्या ठिकाणी संघात घेण्यात आले आहे.

आता भारतीय संघात निवडीची प्रतीक्षा

उमरान मलिक हैदराबादच्या संघात सहभागी झाल्यापासून त्याने जगाचं लक्ष वेधून घेतले आहे. यंदाच्या लिलावात हैदराबाद संघाने मलिकला संघात रिटेन केलं होतं. पण अद्याप त्याला भारतीय संघात निवडीची प्रतीक्षा आहे.

सीमा मलिक म्हणतात, "सुरुवातीला त्याला टीव्हीवर पाहिलं, तेव्हा तो नीट खेळेल की नाही, म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं. पण समालोचकांनी त्याचं कौतुक केल्यामुळे मला जरा बरं वाटलं. आज त्याने आपलं आणि देशाचं नाव केलं, हे पाहून मी खूप आनंदी आहे. त्याने आणखी पुढे जावं."

त्याचे वडील अब्दुल रशीद म्हणाले, "उमरान आता आणखी मेहनत घेईल. भारतीय संघात निवड होण्यासाठी तो अधिक प्रयत्न करत राहील. त्याने भारताची कीर्ती सर्वदूर पसरवावी, असंच आम्हाला वाटतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जम्मू काश्मीर क्रिकेट संघाचं कामकाज पाहण्यासाठी एक तीन-सदस्यीय समिती बनवली आहे. या समितीचे सदस्य म्हणतात, "जम्मू काश्मीरच्या तरुणांमध्ये क्रिकेटचं प्रेम बघून राज्यात वेळोवेळी कॅम्प लावले जातात. सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आता फक्त येथील खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT