Asia Cup 2025 Presentation Ceremony 
Sports

IND vs PaK : हरवल्यानंतरही सोडलं नाही, पाकिस्तानची लाज काढली, टीम इंडियाने नकवीकडून ट्रॉफी घेतलीच नाही, व्हिडिओ

IND vs PaK, Asia Cup Final 2025 : तिलक वर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव करत आशिया चषकावर नाव कोरले. विजयानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी पीसीबीचे प्रमुख मोहसीन नकवी यांना झटका दिला.

Namdeo Kumbhar

Asia Cup 2025 Presentation Ceremony : ४१ वर्षात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये आशिया चषकाची फायनल रंगली. भारताने नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. यंदाचा आशिया चषक पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरला. पाकिस्तानविरोधात खेळू नये, त्यामुळे भारतामध्ये तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. पण बीसीसीआयने खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय खेळाडूंनी मैदानावर पाकिस्तानची लाज काढण्याची कोणताही संधी सोडली नाही. आशिया चषक जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी चषक घेण्यास नकार दिला, कारण तो पाकिस्तान क्रिकेटचे प्रमुख मोहसीन नकवी यांच्या हस्ते दिला जाणार होता. भारताच्या संघाने पाकिस्तानच्या नकवीची सगळ्या जगासमोर लाज काढली. भारतीय खेळाडूंनी चषकाशिवायच विजयाचे सेलीब्रेशन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिलक वर्माच्या शानदार ६९ धावांच्या झंझावाती खेळीच्या बळावर भारताने आशिया चषकावर नाव कोरले. तिलक याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर अभिषेक शर्मा याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. आशिया चषकाच्या पुरस्कार समारंभात ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय खेळाडूंनी नकवी यांच्या हातून आशिया चषक स्वीकारण्यास नकार दिला. या कारणामुळे पुरस्कार वितरण समारंभाला तासभर उशीर झाला. मोहसीन नकवी याची सहळ्या जगासमोर भारतीय खेळाडूंनी लाज काढली. पाकिस्तानच्या पराभवापेक्षाही भयंकर अपमान नकवी यांना वाटला असेल. आयुष्यभर नकवी यांच्या मनात ही सल राहणार आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ जणांचा जीव घेतला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धाचे सावट उभारले होते. २६ जणांच्या जीव घेणाऱ्या पाकिस्तानविरोधात सगळा भारत एकवटला होता. भारतीय खेळाडूंनीही चोख कामगिरी बजावत पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात चारीमुंड्या चीत केले. त्यानंतर पुरस्कार सोहळ्यात पाकिस्तानच्या नकवी यांच्या हस्ते चषक न घेता सगळ्या जगासमोर लाज काढली. त्यामुळे नकवी यांना तोंड लपवून निघून जावं लागले. अख्या जगासमोर भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर कुरघोडी केली. भारतीय खेळाडूंनी आशिया चषकाशिवाय सेलीब्रेशन केले.

आशिया चषक पाकिस्तानच्या नकवी यांच्याकडून स्वीकारण्यास सूर्या आणि ब्रिगेडने नकार दिला. त्यांनी चषकासारखेच सेलीब्रेशन केले. सगळा संघ आनंदात होता. या सेलीब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारताने टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर ज्या प्रकारे सेलीब्रेशन केले होते. अगदी तसेच सेलीब्रेशन दुबईच्या मैदानावर पाहायला मिळाले. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतासमोर १४७ धावांचे आव्हान दिले होते. भारताची सुरूवात खराब झाली होती. पण तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्या झंझावाती खेळीने भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेवणावरून 'Bigg Boss 19' च्या घरात महाभारत; बसीर अली अन् नेहलमध्ये कडाक्याचे भांडण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा करण्यात आली बंद

Railway NTPC Recruitment: खुशखबर! रेल्वेत ८,८७५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Heartbreaking : पावसात पोहायला गेले अन् आक्रीत घडलं, ४ जण नदीत बुडाले, बुलढाण्यावर शोककळा

Konkan Tourism : नवरात्रीला कोकणात गेलाय? मग देवीच्या दर्शनाला नक्की जा, सर्व मनोकामना होतील पूर्ण

SCROLL FOR NEXT