सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघाला या सामन्यात ६२ चेंडू आणि १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात केएल राहुलने कासवगतीने खेळी केली आणि त्यानंतर तो बाद झाला.
ज्या खेळपट्टीवर ट्रेविस हेडने ३० चेंडूत ८९ धावा केल्या. त्याच खेळपट्टीवर केएल राहुलने ३३ चेंडूंचा सामना करत अवघ्या २९ धावांची खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याला १ चौकार आणि १ षटकार मारता आला. या सुमार कामगिरीनंतर संघमालक आपला संताप व्यक्त करताना दिसून आले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी केएल राहुलला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. बीसीआयच्या या निर्णयावर जोरदार टीका केली गेली होती. मात्र आता केएल राहुलची खेळी पाहून क्रिकेट फॅन्स अजीत आगरकरांना थँक यु बोलताना दिसून येत आहेत. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने वेगाने धावा करणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र केएल राहुलने ८७.८८ च्या सरासरीने धावा केल्या. तो १० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतला. त्यावेळी लखनऊला अवघ्या ५७ धावा करता आल्या होत्या.
या डावात लखनऊला १०० धावांचा पल्ला गाठणं ही कठीण झालं होतं. मात्र त्यानंतर आयुष बदोनी आणि निकोलस पुरनने शानदार फलंदाजी केली आणि संघाचा गााड पुढे नेला. निकोलस पुरन नाबाद ४८ तर आयुष बदोनी नाबाद ५५ धावांवर माघारी परतला.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया...
एका फॅनने लिहिले की, 'केएल राहुल हा कसोटीतील शानदार फलंदाज आहे. हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करणं कठीण आहे. कारण त्याच्यासोबत फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर दबाव येतो. जेव्हा तुम्ही ३० चेंडू खेळता तेव्हा तुम्ही मोठी खेळी करुन माघारी परतणं गरजेचं आहे. त्याची निवृत्ती ही इ्तर फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.