Tennis News: नोवाक जोकोविच फिरवणार फ्रेंच ओपन, विम्बल्डनकडे पाठ?
Tennis News: नोवाक जोकोविच फिरवणार फ्रेंच ओपन, विम्बल्डनकडे पाठ? - Saam Tv
क्रीडा | IPL

Tennis News: नोवाक जोकोविच फिरवणार फ्रेंच ओपन, विम्बल्डनकडे पाठ?

वृत्तसंस्था


बेलग्रेड : गेल्याच महिन्यात लसीकरण केलेले नसल्यामुळे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला मुकावे लागलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने लसीकरणास पुन्हा नकार दिला आहे. भविष्यात कुठल्याही स्पर्धेच्या आयोजकांनी लसीकरणाची (Corona Vaccine) मागणी केल्यास, ती स्पर्धा वगळेल परंतु, लसीकरण करणार नाही असे स्पष्ट उत्तर अव्वल जोकोविचने एका मुलाखतीत बोलताना दिले आहे. (Tennis Star Novak Djokovic denies Corona Vaccine)

‘‘माझा लसीकरणाला विरोध नाही, परंतु, मी माझ्या शरीरात काय घ्यावं, हा सर्वोतपरी वैयक्तिक निर्णय असावा, तो कोणीही दुसऱ्यावर लादू नये.’’ असा पुनरुच्चार जोकोविचने यावेळी केला आहे. या निर्णयासाठी भविष्यातील विम्बल्डन (Sports) आणि फ्रेंच ओपनसारख्या ‘ग्रँड स्लॅम’ स्पर्धा सोडण्यास तयार आहेस का? अशा विचारलेल्या प्रश्नाला जोकोविचने ‘हो’ असे उत्तर यावेळी दिले आहे. ‘‘जर लसीकरणासाठी ही किंमत असेल तर, ती मी मोजण्यासही मी तयार आहे.’’ असे ३४ वर्षीय जोकोविचने यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे.

गेल्या महिन्यात लसीकरण केलेले नसल्याने वैद्यकीय सवलतीचा आधार घेऊन मेलबर्नमध्ये दाखल झालेल्या जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला व त्याला विमानतळावरून ताब्यातही घेण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठवडाभर स्थानिक न्यायालयात लढाई लढूनही जोकोविचला स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. निर्णयामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्याची परवानगी नव्हती. लस न मिळाल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. त्यांना ऑस्ट्रेलियातही प्रवेश दिला जात नव्हता.

‘तुझ्या या निर्णयामुळे तू, विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी का गमावत आहेस?’ अशा प्रश्नाला उत्तर देताना, ‘‘कारण माझे निर्णय माझ्या तत्त्वांशी निगडित आहेत. माझ्यासाठी कोणत्याही शीर्षकापेक्षा माझे शरीर महत्त्वाचे आहे.’’ असे उत्तर यावेळी दिले आहे. जोकोविचने आतापर्यंत २० वेळा ‘ग्रँड स्लॅम’ जेतेपदांना गवसणी घातलेली आहे.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी, तो सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यासोबत बरोबरीत होता. परंतु, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतून त्याची हकालपट्टी झाल्यानंतर, राफेल नदालने संधी साधत त्याच्या २१ व्या विक्रमी ‘ग्रँड स्लॅम’ जेतेपदाला गवसणी घातलेली आहे. त्यामुळे आता लसीकरण न करण्यावर ठाम असलेला जोकोविच त्याच्या तत्त्वांसाठी आगामी दोन स्पर्धांकडे पाठ दाखवतो का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

जोकोविच अव्वल स्थानी कायम
विक्रमी ‘ग्रँडस्लॅम’ला मुकावे लागल्यानंतरही नोवाक जोकोविच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. एटीपी क्रमवारीत ३ फेब्रुवारी २०२० रोजी राफेल नदालला मागे टाकून अव्वल स्थान गाठल्यानंतर जोकोविच सलग ८५ आठवड्यापासून अव्वल स्थानी कायम आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT