भारतातील क्रिकेटला ग्रासरूट्स स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी TEN x YOU या उपक्रमाने अंडर-19 संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याच्यासोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक पातळीवरील क्रिकेट प्रतिभेला संधी देणे आणि युवा खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. ही भागीदारी भारतातील तळागाळातील क्रिकेटमधून पुढे येणाऱ्या खेळाडूंना ओळखण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतो. TEN x YOU हा एक स्पोर्ट्स आणि ॲथलीजर ब्रँड आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (मुख्य इनस्पिरेशन ऑफिसर), कार्तिक गुरुमूर्ती (मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि करण अरोरा (मुख्य परिचालन अधिकारी) यांनी हा ब्रँड सह-स्थापित केला आहे. देशभरातील मजबूत अकादमी नेटवर्कमधून मिळालेल्या खऱ्या आणि प्रामाणिक माहितीच्या आधारावर हा ब्रँड आपली ओळख सातत्याने तयार करत आहे.
भारतीय क्रिकेटच्या मूळ स्तरांशी जोडलेले राहण्याच्या उद्देशाने TEN x YOU ने एमआयजी क्रिकेट क्लब, एसआरआर टी-१० अकादमी, क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स आणि उत्तम मजुमदार क्रिकेट सेंटर यांसारख्या अग्रगण्य अकादमींसोबत भागीदारी केली आहे. या संस्था उदयोन्मुख खेळाडूंना घडवतात आणि ब्रँडच्या उत्पादन विकासासाठी महत्त्वाची माहिती देतात.
यावेळी आयुष म्हात्रे म्हणाला, “विरारहून सरावासाठी लांब ट्रेन प्रवास करण्याच्या दिवसांपासून ते आता भारताच्या U-19 टीमचं नेतृत्व करण्यापर्यंत माझा प्रवास कधीही हार न मानण्याचा आणि प्रत्येक खेळात आनंद शोधण्याचा राहिला आहे. क्रिकेट फक्त विक्रमांबद्दल नसून, तो आशा, शिकवण आणि आनंदाबद्दल आहे. TEN x YOU ची तळागाळातील क्रिकेटप्रती असलेली बांधिलकी माझ्या प्रवासासारखी आहे. तरुणांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि खेळाबद्दल पहिल्यांदा प्रेम का वाटलं हे आठवून देण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या या भागीदारीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”
TEN x YOU च्या ॲथलीट इकोसिस्टममध्ये आयुषचा समावेश करताना, TEN x YOU चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक कार्तिक गुरुमूर्ती म्हणाले, “आयुषचा विरार ते आयपीएल आणि आता U-19 भारतीय संघाचा कर्णधार होण्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या प्रतिभा, चिकाटी आणि मेहनतीचा परिणाम आहे. आयुष ही नवीन पिढीतील खेळाडूंचं प्रतिनिधित्व करतो. त्याचा खेळ फक्त जिंकण्याबद्दल नसून, तो आनंद आणि पॅशनबद्दल आहे दे तो दाखवून देतो. आम्ही तरुणांना आयुषसारख्याच निर्धाराने खेळणं कधीही न थांबवण्याची आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देऊ इच्छितो.”
आयुषचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी म्हणाले, “आयुष आणि सचिन तेंडुलकर यांनी दाखवून दिलं आहे की योग्य मार्गदर्शन आणि अथक प्रयत्नांनी कोणत्याही पार्श्वभूमीतील खेळाडू सर्वोच्च स्तरावर पोहोचू शकतात. अकादमी स्तरावर खेळाडूंचं संगोपन करण्यावर TEN x YOU चं लक्ष असणं हेच भारतीय क्रिकेटला जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.”
ही भागीदारी TEN x YOU चं तळागाळातील क्रिकेटशी असलेलं नातं अधिक मजबूत करते. खेळाडूंचे अनुभव उत्पादन डिझाइनमध्ये समाविष्ट करणं, अकादमींशी जवळून जोडलं जाणं आणि पुढील पिढीला प्रेरणा देणं या ब्रँडच्या व्यापक दृष्टिकोनाला बळकटी मिळते. प्रशिक्षक आणि मार्गदर्शक केवळ कुशल खेळाडू घडवतात असं नाही, तर शिस्तबद्ध, जमिनीवर पाय असलेले आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व तयार करतात. त्यांचं मार्गदर्शन, भावनिक गुंतवणूक आणि तांत्रिक कौशल्य हे प्रत्येक खेळाडूच्या प्रवासाचा आधार असतं, ज्यामुळे क्षमता उत्कृष्टतेत रूपांतरित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.