भारतीय संघातील खेळाडूंचा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौरव केला. जय शहा यांनी खेळाडूंना 125 कोटींचा धनादेश दिला.
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झालीय. ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आहेत.
मुंबई विमानतळावरुन निघालेला टीम इंडियाचा ताफा हा वांद्रे वरळी सागरी सेतुवर पोहचलाय. टीम इंडियाचा ताफा थोड्याच वेळात मरीन ड्राईव्ह येथे पोहचणार आहे.
चर्चगेट स्टेशनवर प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी आरपीएफमार्फत सूचना दिल्या जात आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात आहे. गर्दी अनियंत्रित होत असल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय.
टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर पोहचलेत. टीम इंडियाचे खेळाडू सहकुटुंब बाहेर पडले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आता क्रिकेट चाहते प्रतिक्षा करताहेत.
T20 विश्वकप जिंकवून मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचवली आहे. भारतीय संघाचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने चाहते मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर आलेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नागरिकांना एक आवाहन केलं आहे. मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमला कोणी येऊ नका असे आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने पोलिसांनी हे आवाहन केलंय.
टीम इंडियाचे विमान एअरपोर्टवर दाखल होताच वॉटल सॅल्युट देण्यात आलं.
टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर पोहचलेत. टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा केली जातेय. लवकरच त्यांची विजयी रॅली काढण्यात येणार आहे.
चाहत्यांनी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी केल्यामुळे मैदानावरील सगळे गेट बंद करण्यात आले आहे. 35 हजार सीटिंग कॅपॅसिटी असू सर्व स्टेडियम हाऊसफुल झाले आहे.
वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी हाऊस फूल झाले आहे. चाहते मोठ्याने जल्लोष करत आहेत. ओपन बसमधून जल्लोष रॅली काढली जाणार आहे.
मुंबईत पाऊस सुरू झालाय. आज जल्लोष रॅली काढली जाणार आहे. पण पाऊस सुरू झाल्याने क्रिकेट प्रेमींची तारांबळ उडालीय.
वानखेडे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जात आहे.त्यामुळे प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली आहे.
भारतीय संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज झालं आहे. भारतीय खेळाडू ४ वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार आहेत.
भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत.
भारतीय खेळाडू नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.