virat kohli with anushka sharma yandex
Sports

Virat Kohli Viral Video: सुट्टीवर असलेला विराट नेमका कुठंय? त्या Viral Video मुळे आला चर्चेत

Virat Kohli News In Marathi: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारताला टी -२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट शांत राहीली. मात्र फायनलमध्ये त्याने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. भारताने वर्ल्डकप जिंकताच विराटने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत खेळताना दिसून आला होता.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराटची बॅट शांतच राहिली. त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तेव्हापासून ते आतापर्यंत तो विश्रांतीवर आहे. दरम्यान बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत तो कमबॅक करताना दिसून येणार आहे.

विराट कुठंय?

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काही खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळत आहेत, तर रोहितने देखील फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. मात्र विराट कोहली अजूनही मैदानात परतलेला नाही.

विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अंदाज येईल की, विराट कोहली नेमका कुठे आहे. विराट कोहली अजूनही लंडनमध्ये आहे. तो आपल्या पत्नीसह लंडनमध्ये असल्याचं दिसून आलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहण्यात आलंय की, विराट आणि अनुष्का लंडनमध्ये असल्याचं दिसून आलं आहे.

भारत- बांगलादेश मालिकेतून करणार कमबॅक

विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत तो आपला शेवटचा वनडे सामना खेळताना दिसून आला होता.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो कसोटी क्रिकेटपासून दुर आहे. इंग्लंडचा संघ भारतात आला होता, त्यावेळी विराटने वैयक्तिक कारणास्तव या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत विराट कोहली कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT