team india yandex
Sports

Team India Schedule: ८ संघ, २७ सामने, वनडे वर्ल्डकपपर्यंत कसं आहे टीम इंडियाचं शेड्यूल? पाहा एकाच क्लिकवर

Team India Full Schedule: भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत कसं आहे भारतीय संघाचं शेड्यूल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

गेली २ वर्ष भारतीय संघासाठी खूप चांगली राहिली आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विजय मिळवला.

आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतही विजयाची नोंद केली आहे. इथून पुढे भारतीय संघाच लक्ष २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर असणार आहे. या स्पर्धेपर्यंत भारतीय संघाला एकूण ९ मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान जाणून घ्या भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक.

आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघाला फार वनडे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघाला लागोपाठ वनडे मालिका खेळायच्या आहेत. यादरम्यान भारतीय संघ एकूण २७ वनडे सामने खेळणार आहे. भारतीय संघ ८ संघांविरुद्ध ३-३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. यादरम्यान भारतीय संघाला एका संघाविरुद्ध २ वेळेस मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे.

कसं असेल भारतीय संघाचं वेळापत्रक?

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, वेस्टइंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. या सर्व संघाविरुद्ध भारतीय संघ १-१ मालिका खेळणार आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध २ वेळेस मालिका खेळणार आहे.

भारतीय संघाला एकूण ९ मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. यापैकी ६ मालिका या भारतात होणार आहेत, तर ३ मालिका देशाबाहेर होणार आहेत. या मालिकांची सुरुवात यावर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका झाल्यानंतर, भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये भारत - न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. जुलै २०२६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. तर सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड आणि डिसेंबरमध्ये भारत - श्रीलंका हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT