क्रीडा

AUS A vs IND A: टीम इंडियावर लागला बॉल टॅम्परिंगचा आरोप, आरोपांनंतर अंपायरवर भडकला इशान किशन, म्हणाला, अतिशय मूर्खपणा...!

AUS A vs IND A: भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला अटेस्टनधिकृत कसोटी सामना 31 ऑक्टोबरपासून सुरू झाला.

Surabhi Jagdish

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यामध्ये सामना सुरु होता. दरम्यान या सामन्यात वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाला या महिन्यात ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. त्याआधी भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला अटेस्टनधिकृत कसोटी सामना 31 ऑक्टोबरपासून सुरू झाला. सामना संपेपर्यंत यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप अंपायरकडून लावण्यात आला आहे.

खेळ सुरु होण्यापूर्वीच बदलला बॉल

आज रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारत अ च्या खेळाडूंना सामना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बॉलशी छेडछाड करण्यात आली होती. अंपायर शॉन क्रेग यांनी भारतीय खेळाडूंना याची माहिती दिली. अंपायर म्हणाले, जेव्हा तुम्ही स्क्रॅच करता तेव्हा आम्ही बॉल बदलतो. त्यामुळे यावर चर्चा होणार नाही, सामना सुरू करू.

कोणी केलं बॉल टॅम्परिंग?

दरम्यान बॉल टॅम्परिंग कोणी आणि केव्हा केलं हे भारतीय टीमला सांगण्यात आलं नाही. अंपायरचं हे वागणं भारतीय खेळाडूंना आवडलं नाही आणि त्यांनी अंपायरकडे असहमती व्यक्त केली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, क्रेगने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'आता चर्चा नको, सामना सुरू करा.'

अंपायरशी भिडला इशान किशन

यावेळी भारत अ टीमचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन अंपायरच्या निर्णयावर चांगलाच संतापला होता. त्याने रागाने त्यांनी याला ‘बेवकूफी भरा फैसला’ असं म्हटले. याला अंपायरने उत्तर दिले, 'तुम्हाला असहमतीसाठी तक्रार केली जाईल. हे वर्तन ठीक नाही. तुमच्या (टीमच्या) कृतीमुळेच आम्ही बॉल बदलला.

इंडिया एचा पराभव

दरम्यान या झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया अ संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. भारताने चौथ्या डावात 226 रन्स करून सामना जिंकला. भारत ए टीमने पहिल्या डावात 107 रन्स केले होते. यानंतर ऑस्ट्रेलिया अ टीमचा डाव १९५ रन्सवर आटोपला. दुसऱ्या डावात साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर भारत अ संघाने ३१२ रन्स केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT