team india twitter
क्रीडा

Team India Squad Announced: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा! मराठमोळ्या रहाणेला मिळाली मोठी जबाबदारी

Team India Squad For West Indies Tour: या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

India Tour Of West Indies: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

शुक्रवारी(२३ जून) बीसीसीआयने १६ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. ज्यात रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर अजिंक्य रहाणेला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. (Team India Squad For West Indies Tour)

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा येत्या १२ जुलैपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेला १२ जुलैपासून तर टी-२० मालिकेला २७ जुलै आणि ३ ऑगस्टपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे.

कसोटी मालिकेसाठी युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी दिली गेली आहे. तर उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) नेमणूक करण्यात आली आहे. (Latest Cricket Updates In Marathi)

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय भारतीय संघ (Team India ODI Squad For West Indies Tour:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT