team india news Saam tv
Sports

टीम इंडियाला मोठा धक्का; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यातून स्टार खेळाडू संघाबाहेर

team india news : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात स्टार खेळाडू खेळणार नसल्याचे समोर आले आहे.

Vishal Gangurde

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताला मोठा धक्का

स्टार खेळाडू व्हायरल आजारामुळे सामन्याबाहेर

सामन्यात संजू सॅमसनच्या ऐवजी ईशान किशन ओपनिंग करण्याची शक्यता

टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सामने होणार आहे. याच दिवशी भारताचा यूएसए विरोधात सामना होणार आहे. मुंबई वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता सामना सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह सामना खेळणार नाही. मागील सीरीजमध्ये अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करणारा संजू सॅमसनला देखील बाहेर बसावं लागणार आहे. त्याच्या ऐवजी ईशान किशन ओपनिंग करताना दिसणार आहे.

मीडिया वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे जसप्रीत यूएसए विरोधात खेळताना दिसणार नाही. हर्षित राणा देखील दुखापत ग्रस्त झाल्याने स्पर्धेच्या बाहेर गेला आहे. बीसीसीआयने मोहम्मद सिराजचा देखील संघात समावेश करण्यात आलाय.

बु्मराहला व्हायरल आजार झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय देखील बुमराहला खेळण्यासाठी मैदानात पाठवणार नाही. सामन्याच्या एक दिवस आधी देखील बुमराह सरावासाठी मैदानात उतरला नव्हता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात देखील खेळण्याची शक्यता धुसर आहे.

अभिषेक आणि ईशान ओपनिंग करणार

टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या आधी झालेल्या सीरीजमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करायचे. परंतु प्रत्येक सामन्यात संजूने भारतीयांना नाराज केलं. त्याने कोणत्याही सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. सीरीजच्या शेवटच्या सामन्यात ईशान किशनने विकेटकिपिंग केली होती. त्यामुळे आज ईशान किशन आणि अभिषेक शर्मा हे दोघे यूएसए विरोधात ओपनिंग करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात देखील सराव सामन्यात दोघे सलामीला उतरले होते.

भारताचा संभाव्य संघ

अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या,शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूच्या अड्ड्यावर भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लाथाबुक्क्यांनी मारहाण|VIDEO

Maharashtra Live News Update: व्ही एस आर कंपनीचे मालक व्हि के सिंग यांची सीआयडी कडून मागील सहा तासांपासून चौकशी सुरू

नागपुरात ढिवसाढवळ्या हत्येचा थरार; नवऱ्याने भर रस्त्यात बायकोच्या बॉयफ्रेंडला संपवलं

Fenugreek Water For Hair: मेथीच्या दाण्याच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे काय?

Dog Behavior: रात्रीच्या वेळेस वाहन चालकांच्या मागे कुत्री का लागतात? हे सत्य वाचून व्हा सावध

SCROLL FOR NEXT